Breakfast Recipe For Fathers Day: 'फादर्स डे' ला नाश्त्यात बनवा चवदार छोले भटुरे, जाणून घ्या सोपी रेसिपी

Breakfast Recipe For Fathers Day: सकाळी नाश्त्यात बनवा छोले भटुरे आणि फादर्स डे होईल खास
Breakfast Recipe For Fathers Day:
Breakfast Recipe For Fathers Day: Sakal
Updated on

Breakfast Recipe For Fathers Day: फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा १६ जून म्हणजे आज साजरा केला जात आहे. रविवार येत असल्याने वडिलांसोबत खास वेळ घालवू शकता. तुम्ही आज वडिलांसा नाश्त्यात खास छोले भटुरे बनवू शकता. हा पदार्थ बनवणे सोपे आहे. चला तर म जाणून घेऊया छोले भटूरे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कसे बनवले जाते.

भटुरे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

2 कप मैद

1/2 कप रवा

1/2 टीस्पून मीठ

1/4 टीस्पून बेकिंग पावडर

1/4 कप दही

तळण्यासाठी तेल

भटूरे बनवण्याची कृती

भटुरे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा, रवा, मीठ, मध, बेकिंग पावडर आणि दही एकत्र करावे. थोडे पाणी घालून मळून घ्यावे. पीठ चांगले मऊ मळावे. नंतर २ तास झाकून ठेवावे.

नंतर मळलेल्या पिठाचे छोटे गोल गोळे करून त्यापासून भटूरे तयार करावे. एका कढईत तेल गरम करून त्यात भटुरा सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.

Breakfast Recipe For Fathers Day:
Morning Breakfast Recipe: उरलेल्या चपातीपासून बनवा स्वादिष्ट समोसा, जाणून घ्या रेसिपी

छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य

1 कप चणे

1 मोठा कांदा

2 टोमॅटो

2/3 हिरव्या मिरच्या

1 टेबलस्पून आले-लसूण पेस्ट

1 टेबलस्पून छोले मसाला

1 चहा कप टोमॅटो प्युरी

चवीनुसार मीठ

1 टेबलस्पून तेल

छोले बनवण्याची कृती

सर्वात आधी छोले बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, छोले मसाला, टोमॅटो प्युरी, मीठ आणि तेल घालून मसाला तयार करावा. मसाले व्यवस्थित भाजून झाल्यावर त्यात रात्रभर भिजवलेले चणे घालून मिक्स करावे. यानंतर पाणी घाला जेणेकरुन सर्व साहित्य चांगले मिक्स होईल. चणे ५-६ शिट्ट्या होईपर्यंत शिजू द्यावे. चणे शिजले असतील तर त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता गरमागरम भटूरासोबत छोले खाऊ शकता आणि फादर्स डे खास बनवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.