भाजीची चव वाढवण्यासाठी 'या' टीप्स वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजीची चव वाढवण्यासाठी 'या' टीप्स वापरा

तुमची भाजी थोडी गोड होतेय का? आज तुम्हाला आम्ही अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याने भाजीतील गोडपणा कमी होण्यास मदत होईल.

भाजीची चव वाढवण्यासाठी 'या' टीप्स वापरा

आरोग्यासाठी (Health) आवश्यक आहे, की आपण चांगले खायला हवे. तसेच ते पौष्टिक असायला हवे. स्वयंपाक (Recipes) जेव्हा चविष्ट होईल तेव्हाच हे शक्य आहे. भाजी जेव्हा चांगली होते तेव्हा माणूस जास्त खातो. वयानुसार योग्य खुराक घेणे खूप महत्त्वाचे आहे. जर असे होत नसेल तर तुम्हाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागेल. जेव्हा कधी तुम्ही घरात भाजी बनवता तेव्हा तुमचे मुले आवडीने खात नाहीत. कारण चव तर चांगली असते. पण थोडी ती गोड झालेली असते. या कारणामुळे तुमचे मुले जेवत नाहीत आणि बाहेरच खायला मागतात. (Tips For Delicious Vegetable Dish)

टोमॅटोचा करा वापर

जेव्हा केव्हा तुम्ही डिश बनवता जसे की बटाटा, भोपळा किंवा कोणतेही मांसहारी पदार्थ, त्यात टोमॅटोचा (Tomato) वापर करा. यामुळे भाजी खूप लज्जतदार होईल. तसेच त्यातील गोडपणाही कमी होईल. भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही त्यात टोमॅटो टाकू शकता. त्याचा वापर तुम्ही कापून किंवा मिक्सरमध्ये बारीक करुन टाकू शकता.

दही टाका (Curd)

दही आरोग्यासाठी खूप चांगले असते. त्याचा वापर तुम्ही भाजीतही करु शकता. ते टाकल्याने भाजीची चव आणखीन वाढेल आणि गोडपणाही कमी होईल. दही वापरताना लक्षात ठेवा की ती ताजी असावी. अन्यथा भाजीची चव खराब होऊ शकते. तसेच दहीचे प्रमाणाकडेही लक्ष द्या.

चिंच एक उत्कृष्ट पर्याय

चिंचेचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. भाजी बनवताना तुम्ही त्यात थोडी चिंच टाका. त्याने तुमची भाजी चांगली होईल. लक्षात ठेवा चिंच चांगली धुवून घ्या. नंतरच त्याचा वापर करा.

लिंबू (Lemon)

तुम्ही तुमच्या भाजीत लिंबूही टाकू शकता. याचा दोन प्रकारे वापर करु शकता. एक भाजी बनवताना लिंबूचा रस त्यात टाका. दुसरे वरुन चवीनुसार भाजीत टाकले तरी होते.

loading image
go to top