Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Food Recipe

Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी

Food Recipe : रोज रोज भाजी पोळीच जेवण कंटाळा देतं; त्यात सुट्टीच्या दिवसानंतरचा दिवस तर खूप कंटाळा देतो; याला पर्याय म्हणून आपण वेगळ्या स्टाईलची भाजी ट्राय करतो पण सोबत पोळ्याच खाव्या लागतात.

हेही वाचा: Food Recipe : उपवासाचे तेच पदार्थ खाण्याची इच्छा नाहीये? एकादशी निमित्त बनवा खमंग भगरीचे धिरडे

पण आता टेन्शन संपवा; हॉटेल मध्ये बनती तशी रुमाली रोटी आता घरी बनवा; पोळीतलाच थोडासा वेगळा हा प्रकार तुमच्या चवदार भाजीची मजा आणखी वाढवेल. तुम्हीही रुमाली रोटीचे शौकिन असाल आणि ही रोटी घरच्याघरी कशी करायची, याची रेसिपी शोधत असाल तर शेवट पर्यंत वाचा..

हेही वाचा: Food Recipe : बनवा पालक पनीर दम बिर्याणी फक्त ३५ मिनिटात

रुमाली रोटी कशी करायची?

साहित्य

२०० ग्रॅम मैदा. आरोग्याच्या दृष्टीने मैदा फार काही चांगला मानला जात नाही. त्यामुळे तुम्हाला नुसत्या मैद्याची रुमाली रोटी खावी वाटत नसेल तर १०० ग्रॅम मैदा आणि १०० ग्रॅम कणिक असं मिश्रणही तुम्ही घेऊ शकता.

२५० ग्रॅम दूध

५० ग्रॅम पाणी

१ टीस्पून मीठ

हेही वाचा: Food Recipe: नाश्त्याला बनवा पौष्टीक अन् टेस्टी कोबीची वडी, पहा सोपी रेसिपी

कृती

१. सगळ्यात आधी मैदा किंवा कणिक चाळून घ्या.

२. त्यानंतर त्यात मीठ टाका.

३. थोडं दूध आणि थोडं पाणी असं हळूहळू टाकून पीठ चांगलं मळून घ्या.

४. हे पीठ तुम्ही जेवढं चांगलं मळाल, तेवढी रोटी मऊ होईल. त्यामुळे ५ ते १० मिनिटे नीट मळून घ्या.

५. त्यानंतर या पीठावर एक ओलसर कपडा टाकून ते १० ते १५ मिनिट झाकून ठेवा.

६. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून त्याची अगदी पातळ अशी रोटी लाटून घ्या.

हेही वाचा: Food Recipe : 'या' सोप्या पद्धतींनी काही मिनिटांत घरीच बनवा चुरमुरे

स्पेशल टीप्स:

१. रुमाली रोटी भाजण्यासाठी तुम्हाला कढईचा वापर करायचा आहे. हिण्डालियमची कढई वापरण्याऐवजी लोखंडी कढई वापरणं कधीही अधिक चांगलं.

२. ही कढई गॅसवर पालथी टाका. कढई तापली की तिच्यावर आधी मिठाचं पाणी शिंपडा. जेणेकरून रोटी कढईला चिटकणार नाही. त्यानंतर त्यावर थोडे तुप किंवा तेल टाका. आणि एका कापडाने ते कढईला व्यवस्थित पसरवून घ्या.

३. या दोन्ही गोष्टींमुळे रोटी अधिक मऊसूत होईल.