esakal | जरा वेगळं खायच आहे, तर बनवा 'ही' पदार्थ
sakal

बोलून बातमी शोधा

जरा वेगळं खायच आहे, तर बनवा 'ही' पदार्थ

जरा वेगळं खायच आहे, तर बनवा 'ही' पदार्थ

sakal_logo
By
गणेश पिटेकर

अंडा मिलेट मठरी आणि चिली योगर्ट डिप

आमंड मिलेट मठरीसाठी

साहित्य

१/२ कप बदाम

१/२ कप बाजरीचे पीठ

१/४ कप गव्हाचे पीठ

१/२ कप बदामाचे पीठ

३ टेबलस्पून बारीक कपलेला कांदा

२ टेबलस्पून बारीक कापलेले आद्रक

१/२ टिस्पून बारीक केलेली हिरवी मिरची

१ टेबलस्पून कापलेले ताजी कोथिंबीर

१/२ कप उकडलेले बटाटे

१ टिस्पून चाट मसाला

चवीनुसार मीठ

१ टिस्पून भाजलेले धने, गावरान तूप-तळण्यासाठी

चिली योगर्ट डिपसाठी

१ एक ग्रीक योगर्ट

१/४ टिस्पून बारीक केलेली हिरवी मिरची

१/२ टिस्पून बारीक कापलेले आद्रक

१/२ कापलेले ताजी कोथिंबीर

१/२ टीस्पून भाजलेले व क्रश्ड केलेला जिरा चवीनुसार

कृती

बदाम १८० डिग्री सेल्सिअसमध्ये प्रीहीट ओव्हनमध्ये ४ मिनिटांपर्यंत ठेवून भाजून घ्या. थंड झाल्यानंतर साल काढून घ्या. चिली योगर्ट डिपसाठी एका वाटीत ग्रीक योगर्ट, आद्रक, हिरवी मिरची आणि हिरवी मिरचीबरोबरच मीठ आणि ब्लॅक पेपर टाकून चांगल्या एकत्र करुन घ्या.

एक मोठे मिक्सिंग बाऊल घ्या आणि त्यात बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, बदामाचे पीठ, बारीक केलेली हिरवी मिरची, आद्रक, कांदा, उकडलेले बटाटे, भाजलेला जीरा, चाट मसाला, कोथिंबीर आणि कापलेले बदाम टाकून एकत्र करु घ्या. आता यात एक मुलायम डो तयार करा आणि ३० मिनिटांपर्यंत सेट होण्यासाठी ठेवून दे. आता लाटून घ्या. त्यानंतर पॅनमध्ये कमी गॅसवर चांगल्या प्रकारे तळून घ्या. दोन्ही बाजूने तूप लावा. तुमची मठरी तयार. ती चिली योगर्ट डिपबरोबर वाढा.

आमंड अमरनाथ कबाबासाठी

साहित्य

-------

१/४ कप बदाम

१/४ कप अमरनाथ पीठ

१/४ कप बदामाचे पीठ

२ टिस्पून कापलेले आद्रक

१ टिस्पून कापलेले लसूण

३ टेबलस्पून कापलेला कांदा

२ टेबलस्पून उकडलेले व मॅश केलेले बटाटे चवीनुसार मीठ

१/२ टीस्पून लाल मिरची

१/४ गरन मसाला पावडर तळण्यासाठी तेल

कृती

बदाम १८० डिग्री सेल्सिअसमध्ये प्रीहिट ओव्हनमध्ये ४ मिनिटांपर्यंत ठेवून भाजून घ्या. आणि थंड झाल्यानंतर सालटे काढू घ्या. एका वाटीत अमरनाथ पीठ, बदामाचे पीठ, सालटे काढलेले बदाम, कापलेले आद्रक, कांदा, हिरवी मिरची, मॅश्ड बटाटे, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि कापलेली कोथिंबीर टाका आणि चांगल्या प्रकारे एकत्र करुन घ्या. मिश्रणापासून कबाब तयार. मध्यम गॅसवर एक पॅन गरम करा आणि तेल टाकून कबाब सोनेरी रंगाचे आणि स्क्रिपी होईपर्यंत तळा. कबाब आपल्या आवडीच्या चटणीबरोबर खा.