Chicken Biryani Recipe: रविवार स्पेशल करा अशी टेस्टी चिकन बिर्याणी, पहा सोपी रेसिपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken Biryani Recipe

Chicken Biryani Recipe: रविवार स्पेशल करा अशी टेस्टी चिकन बिर्याणी, पहा सोपी रेसिपी

रविवार म्हटलं की बिर्याणीचा हा बेत असतोच. आज जर तुम्ही बिर्याणी बनविण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचाच. कारण आज आम्ही तुम्हाला हटके चिकन बिर्याणी कशी करायची? हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया चिकन बिर्याणी रेसिपी

साहित्य-

 • चिकन

 • बिर्याणी चा तांदूळ ( बासमती असेल तर उत्तम)

 • ७ ते ८ मिरच्या

 • दालचिनी

 • वेलदोडे

 • शाहि जिरे

 • दही

 • मीठ चवीनुसार

 • हळद

 • लाल तिखट चमचे

 • कांदे पातळ चिरून तळून घेतलेलं

 • आलं लसूण पेस्ट

 • पुदिना

 • दुधात भिजवलेली ७ ते ८ काड्या केसर

 • भिजवलेली कणिक

कृती -

 • तांदूळ धुवून अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवा

 • मोठ्या भांड्यात २ ते३ वेलदोडे आणि १ ते २ मिरच्या आणि थोडेसे जास्त मीठ टाकून पाणी उकळायला ठेवा.

 • एका भांड्यात चिकन, मीठ , हळद, लाल तिखट, ३ ते ४ मिरच्या , दही, शाही जिरे २ चमचे, आलं लसूण पेस्ट, दालचिनी, ४ ते ५ वेलदोडे आणि २ ते ३ चमचे कांदा तळण्यासाठी वापरलेलं तेल, वाटीभर पुदिना, १ वाटी तळलेला कांदा टाकून मिक्स करुन घ्या.

 • आता ज्या भांड्यात बिर्याणी बनवायची त्यात ते मिश्रण टाकून अर्धवट शिजवून घ्या,

 • उकळत्या पाण्यात तांदूळ टाकून अर्धवट शिजवून घ्या.

 • अर्धवट शिजवलेलं भातातून पाणी काढून टाका आणि हा भात चिकन वर पसरवून घ्या.

 • आता भातावर केसर, तळलेला कांदा, कांदा तळलेलं तेल २ चमचे,केसर दूध, थोडासा पुदिना टाका. अगदी अर्धी वाटी म्हणजे बिर्याणी पूर्ण शिजायला लागेल इतपत पाणी टाकून घ्या.

 • कणिक लावून त्यावर झाकण ठेवून भांडे सील करा आणि अर्धा तास मंद आचेवर गॅस वर शिजवून घ्या. आणि १५ ते २० मि नंतर काढून सर्व्ह करा.