

Reheating Fridge Food?
esakal
आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी जास्त जेवण बनवून ते फ्रिजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. भूक लागेल तेव्हा अन्न फ्रिजमधून काढून ते गरम करून खाल्ले जाते. यामुळे वेळ आणि कष्ट वाचत असले, तरी एकच अन्न परत-परत गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अन्नाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी खालील गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.