
Breakfast साठी बनवा टेस्टी आणि हेल्दी पनीर चिल्ला, वेटलॉस डाएटसाठी चांगला पर्याय
Paneer Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यामध्ये Breakfast काय बनवावं असा प्रश्न अनेक महिलांना पडत असतो. एवढचं काय तर स्वयंपाकासाठी Meal देखील काय बनवावं या विचाराने अनेक महिलांचा पुरता गोंधळ उडतो. Food Tips Marathi Try Paneer Chilla Dish for Morning Breakfast
खास करून नाश्ताची सकाळची वेळ Morning Breakfast ही गडबडीची वेळ असल्याने झटपट होणारा मात्र तितकाच हेल्दी असा नाश्त्याचा पर्याय शोधणं म्हणजे मुश्किलच. मात्र यासाठी तुम्ही थोडा विचार केला तर तुम्हाला अनेक पर्याय सापडतील.
नाश्त्यासाठी पनीर चिला Paneer Chilla हा देखील एक उत्तम पर्याय आहे. खरं चिला म्हणजे पोळा हा तसा भारतातील एक पारंपरिक पदार्थ आहे. मुख्यत: ठिकाणी बेसनापासून चिला तयार केला जातो. चिला म्हणजेच एखाद्या पीठाचा पोळा. चिला हा वेगवेळ्या पिठांपासून किंवा भाज्यांचा वापर करून देखील तयार केला जातो.
मुगडाळ चिला, कांदा टोमॅटोचा चिला किंवा पोळा तसचं तांदळाच्या पीठाचा किंवा रव्याचा चिला अशा अशा यात अनेक व्हरायटी पाहायला मिळतात. आज आम्ही तुमच्यासाठी पनीर चिलाची रेसिपी घेऊन आलो आहोत.
पनीर चिलासाठी लागणारं साहित्य
पनीर १०० ग्रॅम, दोन वाटी बेसन, कोथिंबिर, अर्धा टि स्पून ओवा, १ टी स्पून धणे-जीरं पूड, हळद पाव चमचा, १ टी स्पून लाल मिरची पावडर, चाट मसाला चवीनुसार मीठ आणि तेल
पनीर चिला बनवण्याची रेसिपी (how to make paneer chilla recipe)
पनीर चिला बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये बेसणं घ्यावं. यात बारीक चिरलेली कोथींबिर, ओवा, हळद, मिरची पावडर, धणे-जिरं पूड चवीनुसार मीठ टाकावं.
यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करा. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्या. आता एका बाऊलमध्ये पनीर किसून तयार ठेवा
गॅसवर एखादे नॉनस्टीक पॅन ठेवा. पॅन तापल्यावर त्यावर अर्धा चमचा तेल पसरवा. तेल लावण्यासाठी तुम्ही कांद्याचा किंवा एखाद्या ब्रशचा वापर करू शकता.
आता एखादा डाव किंवा पळीच्या मदतीने मिश्रणाचा पातळ पोळा पॅनवर टाका. मिश्रण एकसामान पसरवा. यावरून तेलाचे काही थेंब सोडा
हे देखिल वाचा-
त्यानंतर साधारण मिनिटभराने या पोळ्याच्या वरील बाजूवर किसलेलं पनीर एक समान पसरवा. यावर थोडा चाट मसाला भुरभूरा. पनीर उलथण्याच्या मदतीने पोळ्यावर चांगल प्रेस करा.
साधारण २-३ मिनिटांनी चिला पलटा. त्यानंतर पनीरची बाजू अगदी मिनटभरासाठीच शेकू द्या. त्यानंतर चिला पुन्हा पलटून तो दुमडा.
अशा प्रकारे सर्व पीठाचे चिला म्हणजेच पोळे तयार करा.
हे पनीर चिला तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता. पनीरमध्ये कॅल्शियम Calcium आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने नाश्त्यासाठी हा एक हेल्दी पर्य़ाय आहे. त्याचप्रमाणे वेटलॉस डाएटसाठी Weight loss Diet देखील हा एक चांगला प्रोटीन युक्त पर्याय आहे.