

Fried Egg Masala
Sakal
easy fried egg masala recipe for breakfast: रविवार म्हणजे थोडा आराम, थोडी मजा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चविष्ट नाश्ता होय. रोजच्या धावपळीत अनेक वेळा ऑम्लेट, उकडलेली अंडी किंवा साधी अंड्याची भाजीच खातो. पण या रविवारी काहीतरी वेगळं, झणझणीत आणि खास ट्राय करायचं असेल तर Fried Egg Masala हा उत्तम पर्याय आहे. मसाल्यांचा खमंग सुगंध, कांदा-टोमॅटोची चव आणि वरून परफेक्ट फ्राय केलेली अंडी… ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना? ही रेसिपी केवळ चवीलाच जबरदस्त नाही तर बनवायलाही अतिशय सोपी आहे. कमी वेळात तयार होणारी ही डिश नाश्त्यासोबतच चपाती किंवा पावाबरोबरही छान लागते. घरच्यांना आणि खासकरून अंडीप्रेमींना नक्कीच आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊया लागणारे साहित्य आणि कृती काय आहे.