esakal | Ganeshotsav Special : उकडीचे मोदक
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav Special : उकडीचे मोदक

Ganeshotsav Special : उकडीचे मोदक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : अर्धा कप तांदळाची पिठी, चिमूटभर मीठ, एक टेबलस्पून तूप, पाव कप दूध, एक टेबलस्पून खसखस, २ कप खोवलेला नारळ, १ कप गूळ, पाव टेबल स्पून वेलची पावडर, जायफळ पावडर, केसर.

कृती : तांदळाची पिठी बाऊलमध्ये घ्या. मीठ, तूप घाला आणि चांगले मिक्स करा.दूध घाला आणि चांगले मिक्स करा. पाणी घाला आणि कणकेसारखे मळून घ्या. हा गोळा खूप घट्ट किंवा खूप पातळ नको. स्टीमरचे वरचे भांडे घ्या आणि त्याच्या तळाशी केळीचे पान किंवा कापड ठेवा. मळलेला गोळा केळीच्या पानावर ठेवा. स्टीमरच्या खालच्या भागात अर्धा भाग पाणी ठेवा आणि ते गरम करायला सुरुवात करा. आता वरचे भांडे त्यावर ठेवा. झाकण लावा आणि मंद आचेवर सुमारे दहा ते पंधरा मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करा. पीठ त्या स्टीमरमध्येच सुमारे दहा मिनिटे राहू द्या. मंद आचेवर एक कढई ठेवा. त्यावर खसखस घाला आणि थोडा वेळ परता. खसखस फिकट सोनेरी रंगाची होऊ लागल्यावर त्यात खोवलेले खोबरे घाला. नारळातले पाणी निघून जाईपर्यंत म्हणजे दोन-तीन मिनिटे परता. गूळ, ड्राय फ्रूट्स घाला आणि चांगले मिक्स करा.

गूळ वितळेपर्यंत मध्यम आचेवर तीन-चार मिनिटे फ्राय करा. गॅस बंद करा आणि जायफळ पावडर, वेलची पावडर घाला आणि मिक्स करा. उकड गरम असतानाच पुन्हा थोडी मळून घ्या. तिचा छोटा गोळा घ्या. हा गोळा तळहातांमध्ये थोडा दाबा आणि चपटा आकार तयार करा. तुम्ही बोटांनी पारीही तयार करू शकता. गोळा हातात घेऊन त्याच्या कडा दाबा म्हणजे पारी तयार होतील. आता या गोळ्यात सारण भरा आणि पाकळ्या बंद करा. हा मोदक स्टीमरमध्ये ठेवा. मोदकावर थोडे केशर भुरभुरा. स्टीमरमध्ये मोदक ठेवून मध्यम आचेवर दहा मिनिटे वाफवून घ्या. गॅस बंद करा. आपले मोदक तयार आहेत!

loading image
go to top