esakal | गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड

गणपतीच्या नेवैद्यासाठी अशी बनवा मोदकाची उकड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. परंतु, मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक बणवने काही अवघड काम नाही. आज आम्ही तुम्हाला उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहो. चला तर जाणून घेऊ या...

लागणारे साहित्य

सुवासिक तांदूळ (आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी, एक छोटा चमचा तेल आणि तूप व मीठ

हेही वाचा: शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

बनवण्याची कृती

तांदूळ धुऊन त्यातील सर्व पाणी काढून टाका. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजत ठेवा. नंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटा. वाटताना तांदूळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण, दीड वाटी पाणी घालावेच. ही पेस्ट पातेल्यात काढून टाका. त्यात चवीपुरता मीठ आणि वर लिहिलेल तेल आणि तूप घालून ते गॅसवर ठेवा आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहा. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी, जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाचा पुरण त्यात भरा आणि कळीदार मोदकविनासायास बनवा.

loading image
go to top