Gatari Special Kala Mutton: गटारी अमावस्येला बनवा सोप्यात सोपं अन् झटपट बनणारं काळं मटण

Gatari Amavasya Non-Veg Dinner Ideas: गटारी अमावस्येसाठी झणझणीत आणि झटपट तयार होणारं काळं मटण खास तुमच्यासाठी!
Gatari Special Jhatapat Kala Mutton
Gatari Special Jhatapat Kala Muttonsakal
Updated on

थोडक्यात:

  1. २५ जुलै २०२५ रोजी श्रावण महिन्याची सुरुवात होणार असल्याने २४ जुलैला गटारी अमावस्या साजरी केली जाईल.

  2. या दिवशी नॉनव्हेज प्रेमी खास मटण व चिकन रेसिपींचा आनंद घेतात.

  3. यंदा मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांसोबत मस्त मटणाची रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता.

Quick Maharashtrian Black Mutton Recipe: २५ जुलै २०२५ पासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजेच गटारी अमावस्येला, नॉनव्हेज प्रेमींना पर्वणीच असते. या दिवशी मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येतात, धमाल करतात आणि विविध स्वादिष्ट नॉनव्हेज पदार्थांचा आस्वाद घेतात. खास करून या दिवशी चिकन आणि मटणाच्या खास रेसिपी बनवल्या जातात. अशाच झटपट तयार होणाऱ्या आणि चविष्ट मटण रेसिपीपैकी एक आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

साहित्य

मटण १ किलो (नळी, कलेजी, चॉप्स), तिखट १ टेबलस्पून, कांदे २, वाटलेले आले-लसूण-कोथिंबीर १ टेबलस्पून, कोल्हापुरी कांदा मसाला २ टेबलस्पून, तेल पाऊण वाटी, हळद, भाजलेले तीळ २ टेबलस्पून, मीठ.

Gatari Special Jhatapat Kala Mutton
Akhad Special Recipe: अस्सल मराठमोळ्या झणझणीत चवीसह बनवा आखाड स्पेशल 'मटण खर्डा'! लगेच नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

मटण स्वच्छ धुऊन त्याला हळद, मीठ, लावून कुकरमध्ये पाणी न टाकता शिजवून घ्या. अंगचे पाणी सुटेल, ते आटवा. सुक्या खोबऱ्याची वाटी जाळावर धरून काळी होईपर्यंत भाजा. कांदे हाताने किंवा वरवंट्याने फोडून अख्खे जाळावर भाजा. खोबऱ्याचे तुकडे करून खोबरे व भाजलेला कांदा वाटून घ्या. त्यात तीळ घालून पुन्हा वाटा. कढईत तेल तापवून त्यात वाटलेले कांदा-खोबरे परता. तिखट, गरम मसाला, कांदा मसाला, शिजलेले मटण घाला. उकळी येऊ द्या. मीठ, पाणी घाला. लालकाळसर तवंग येऊन रश्श्याला वास सुटेल तेव्हा आच बंद करा.

नोट

कांदा-खोबरे जाळावर भाजल्यामुळे त्याला काळपट रंग येतो म्हणून त्याला 'काळं मटण' म्हणतात.

FAQs

1. गटारीसाठी नेमकी कोणती नॉनव्हेज डिश सर्वाधिक लोकप्रिय आहे?

गटारी अमावस्येसाठी मटण रेसिपी सर्वाधिक लोकप्रिय असते, विशेषतः कोल्हापुरी झणझणीत काळं मटन. त्याशिवाय काही ठिकाणी चिकन रस्सा, सुकट भाजी, मासे फ्राय, अंडी भुर्जी असे प्रकारही आवडीने केले जातात.

2. काळं मटन बनवताना कोणता मसाला खास वापरला जातो?

खास कोल्हापुरी कांदा मसाला, भाजलेलं खोबऱं आणि कांद्याचं वाटण, तसेच भाजलेले तीळ हे काळं मटनाची चव खुलवणारे महत्वाचे घटक आहेत. यामुळे मटनाला खास रंग, चव आणि सुगंध मिळतो.

3. झटपट काळं मटन बनवण्यासाठी कोणती तयारी आधी करावी लागते?

झटपट रेसिपीसाठी मटन स्वच्छ करून त्याला हळद व मीठ लावून आधीच कुकरमध्ये शिजवून ठेवावं. त्याचबरोबर खोबरे, कांदे भाजून वाटण तयार ठेवणं, आणि साहित्य मोजून ठेवणं यामुळे वेळ वाचतो.

4. कोल्हापुरी मसाला नसल्यास पर्यायी मसाला काय वापरता येईल?

कोल्हापुरी मसाला नसेल, तर घरच्या घरी साधा गरम मसाला, लाल तिखट, धणे-जिरे पावडर आणि थोडं भाजलेलं खोबरं एकत्र करून वापरता येऊ शकतो. त्यात जर थोडं कसुरी मेथी, काळं मिरी आणि थोडंसं बडिशेपही घातलं, तर चवेत भरपूर खोबळपणा येतो. अशा प्रकारे तुम्ही घरगुती पद्धतीने 'कोल्हापुरी सारखा' ठसका असलेला मसाला तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com