esakal | कुरकुरीत - चुरचुरीत : वरणाची झाली आमटी
sakal

बोलून बातमी शोधा

Varan Amti

कुरकुरीत - चुरचुरीत : वरणाची झाली आमटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- गौरी कोंडे, पुणे

आमचा बारा जणींचा भिशी ग्रुप आहे. महिन्यातून एकदा जिची भिशी लागेल तिने घरीच जेवणाची पार्टी द्यायची. असे प्रत्येक महिन्यात एकीकडे आम्ही जेवणाची पार्टी करतो.

माझी भिशी लागली, त्यावेळची गंमत सांगते. मी पुरणपोळी करण्याचे ठरवले. मदतीला माझी मुलगी ऋतुजा होतीच. पुरणपोळी, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, कोशिंबीर, भजी, पापड असे सर्व करून झाले. मी आमटी करायला घेतली. त्याच वेळेस आमची लाइट गेली. मी आमटीला फोडणी दिली आणि त्यात डाळीचे काढलेले पाणी घालायचे सोडून वरण घातले. लाइट आल्यानंतर सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. मी लगेच दुसरे वरण लावले; पण आमटी थोडी घट्टच झाली.

मैत्रिणी जेवायला बसल्या, त्यावेळेस मी त्यांना झालेला प्रकार सांगितला. त्यावेळेस आम्हा सर्वांची हसून-हसून पुरेवाट झाली.

loading image
go to top