Green Chana Bhaji : पार्टनरला खाऊ घाला ही चटपटीत अन् हेल्दी भाजी, जाणून घ्या रेसिपी

आज आपण अशीच एक चटपटीत आणि हेल्दी भाजीची रेसिपी जाणून घेणार आहोत
Green Chana Bhaji
Green Chana Bhajiesakal
Updated on

Green Chana Bhaji : काही पदार्थ खाण्याची मजा ही फक्त हिवाळ्यातच असते. आणि थंडीच्या दिवसांत जर चटपटीत आणि हेल्दी असणारी भाजी जेवणात असली तर त्याची गोष्टच निराळी. ऋतूत निघणारी फळं आणि भाज्या खाल्ल्यास तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तेव्हा आज आपण अशीच एक चटपटीत आणि हेल्दी भाजीची रेसिपी जाणून घेणार आहोत. व्हॅलेंटाइन वीकमध्ये ही भाजी खाऊ घालत तुम्ही तुमच्या पार्टनरला सरप्राइजही देऊ शकता.

ही भाजी हरभऱ्याची असणार आहे. हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खाण्याचे शरीराला चांगले फायदे होतात.जाणून घ्या फायदे

हरभऱ्याच्या पाल्यामध्ये प्रथिनं,फायबर आणि कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी ही भाजी म्हणजे वरदान.तुम्ही आतापर्यंत हरभरा भाजून खाल्ला असेल,आता करून पाहा त्याच्या पानांच्या भाजीची सोपी रेसिपी. (Health News)

रेसिपी

  • यासाठी सर्वप्रथम हरभऱ्याचं फतफतं बनवण्यासाठी बाजारातून हरभऱ्याचा पाला आणा.

  • तो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

  • आता मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या.

  • एका प्रेशर कुकरमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये ही डाळ शिजवून घ्या.

  • डाळ शिजल्यानंतर त्यामध्ये हरभऱ्याचा पाला टाका.

  • आता पाला काही वेळ शिजल्यानंतर त्यामध्ये आलं.

  • लसूण मिरचीची पेस्ट टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.

Green Chana Bhaji
Winter Recipe: हिवाळ्यात खायला पौष्टिक असणारं मेथीच्या भाजीच्या पिठलं कस तयार करायचं?

मिश्रण मंद आचेवर शिजू द्या. आता एका वाटीमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये पाणी मिसळून एक घट्टसर मिश्रण तयार करा. हे मिश्रण तयार पालेभाजीमध्ये टाकून एकजीव करून घ्या.

हरभऱ्याच्या पाल्याचं मिश्रण तयार होताच गॅस बंद करा. (Healthy Food) आता एका फोडणीच्या भांड्यामध्ये राईचं तेल किंवा तूप तापवा आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा, चिरलेला लसूण, जिरं- मोहरी, हिंग, लाल मिरची अशी फोडणी घाला.

फोडणी चांगली तडतडल्यानंतर कुकरमधील मिश्रणात ओता. एकदा सर्व मिश्रण एकजीव करा आणि गरमगमरम भात, भाकरी किंवा चपातीसोबत त्याची चव घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com