Benefits Of Fish: हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी खात राहा फिश; आणखीन 'ही' आहेत जबरदस्त फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fish

सौंदर्य प्रसधानामध्ये ही माशाचा वापर केला जातो. अशा या गुणकारी माश्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

Benefits Of Fish: हार्टला हेल्दी ठेवण्यासाठी खात राहा फिश

मासा (Fish) प्रत्येक वयातील व्यक्ती खाऊ शकते. माश्यामध्ये असणाऱ्य़ा पोषक तत्वांचा फायदा आरोग्यासाठी होतो. सुरमई, पापलेट, बांगडा, रावळ, चिंबोरी (Surmai, Paplet, Bangada, Rawal, Chimbori) असे माश्यांची नावे जरी घेतली तरी तोंडाला पाणी सुटते. कोकण साईटला तर याची वेगवेगळ्या व्हरायटी खायला मिळतात. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन्स डि, बी 2 असते. या शिवाय कॅल्शिअम, फॉस्फरस, झिंक, आर्यन, आयोडीन, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यांचे योग्य प्रमाण असते. माशांमध्ये लो फॅट, प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. सौंदर्य प्रसधनामध्ये ही माशाचा वापर केला जातो. अशा या गुणकारी माश्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे .

मासे खाण्याचे फायदे

हार्ट :

ऱ्हदयाला आरोग्यवर्धक ठेवण्यासाठी मासा खूप उपयुक्त आहे. माशामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे स्नायूंना बळकटी आणण्यास मदत करतात.

बौध्दिक क्षमता वाढण्यास होते मदत

आपण लहानपणांपासून एेकतो की, मासा खाल्याने बुध्दीमत्ता वाढते. म्हणूनच गर्भवती महिलेला, लहान मुलांना मासा खाण्यास दिला जातो. हे खरंच आहे. माशात असणाऱ्या फॅटी अॅसीडमुळे बौध्दिक क्षमता वाढते. याचबरोबर स्मरणशक्ती वाढवण्यास देखील मदत होते.

केसांना होतो असा फायदा

केसांना हेल्दी ठेवण्यासाठी डाईटमध्ये याचा समावेश करू शकता. माश्यात असणाऱ्या फॅटी अॅसीडमुळे केसांना शाईन आणि कठीन बनवण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास होतो फायदा :

मासा हा लो फॅट फूड आहे. यामुळे वजन नियंत्रणात येण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या डाईटमध्ये याचा समावेश करू शकता. याचा निश्चीतच तुम्हाला फायदा होईल.

झोप लागण्यास मदत होते

तुम्हाला जर झोपेचा त्रास असेल तर तुम्ही आठवड्यातून किमान ३ वेळा मासे खाल्ले पाहिजेत. मासे खाल्याने झोपे सुधारण्यास मदत होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top