esakal | आजचा रंग गुलाबी : डाएट करताय पिंक सॉल्ट वापरा
sakal

बोलून बातमी शोधा

आजचा रंग गुलाबी : डाएट करताय पिंक सॉल्ट वापरा

आजचा रंग गुलाबी : डाएट करताय पिंक सॉल्ट वापरा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

संजीव वेलणकर

नवरात्रीचा आजचा आठवा दिवस. आजचा रंग गुलाबी आहे. हिमालयीन गुलाबी मीठ हे एक प्रकारच्या खडे मीठाचा प्रकार आहे, जो पाकिस्तानच्या पंजाब भागातील हिमालयाच्या पायथ्याजवळ आढळतो. हे मिठाचे सर्वात शुद्ध रूप आहे, कारण ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. रासायनिक प्रकारानुसार हे साधारण मीठासारखेच आहे, ज्यामध्ये ९८ टक्के सोडियम क्लोराईड आहे. हे मीठ गुलाबी रंगाचे असून ते साध्या मिठापेक्षा अधिक आरोग्यदायी आहे असे समजतात. याला रंगामुळे गुलाबी मीठ ही म्हणतात. जास्त मीठामुळे होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी किंवा डाएटसाठी आजकाल हिमालयन मीठ वापरायला सांगतात. हे मीठ महाग असते.

यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यासारखे खनिज घटक देखील असतात. हे मीठ कोणत्याही प्रकारे आपलल्या नुकसान करत नाही. असे मानले जाते की, गुलाबी हिमालयन मीठात सामान्य मीठापेक्षा कमी सोडियम असते. परंतु, हे खरे नाही. त्यामध्ये ९८ टक्के सोडियम क्लोराईड असते, याचाच अर्थ त्यामध्ये समान प्रमाणात सोडियम असते. हे मीठ अधिक नैसर्गिक मानले जातात. क्लेम्पिंग टाळण्यासाठी नेहमीचे मीठ अधिक रिफाईंड केले जाते. त्यात अनेक घटक मिसळले जातात. परंतु, हिमालयीन मीठ रिफाईंड केले जात नाही आणि त्यात कोणतेही घटक मिसळले जात नाहीत. हिमालयीन मीठ आपल्या शरीरात द्रव संतुलन राखण्यासाठी आणि निर्जलीकरण रोखण्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे म्हणणे योग्य आहे, कारण द्रव संतुलन राखण्यासाठी आपल्याला शरीराला सोडियम आवश्यक आहे. थायरॉईड फंक्शन्स आणि सेल मेटाबोलिझमसाठी आयोडीन महत्वाचे आहे. गुलाबी हिमालयीन मीठात आयोडीनयुक्त मीठापेक्षा कमी आयोडीन असते. याचमुळे आयोडीनची कमतरता असलेल्या लोकांना, या गुलाबी मीठाबरोबर आयोडीनयुक्त मीठ देखील खाल्ले पाहिजे.

हेही वाचा: फिटनेस जपायचाय, भेंडीचे पाणी प्या!

हिमालयीन गुलाबी मीठ सामान्य मीठाप्रमाणे जेवणात किंवा एखादा पदार्थ सिझनिंग करण्यासाठी वापरले जाऊ शकतो. सॅलडवरती शिंपडायला याहून चांगले मीठ नाही, असे प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांचे मत आहे. लोक हे मीठ अंघोळीसाठी देखील वापरतात किंवा या मीठापासून बनवलेला दिवा किंवा मेणबत्ती घरात लावतात.

या मीठाने स्नायूंना संकुचित करून आराम मिळतो, डिहायड्रेशन प्रतिबंधित करते आणि द्रव संतुलन राखते, कमी रक्तदाब प्रतिबंधित करते.

loading image
go to top