
Healthy apple oats pudding recipe for weight loss: सकाळच्या नाश्त्याने दिवसाची सुरुवात निरोगी आणि उत्साही व्हावी, यासाठी पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी - अॅपल ओट्स पुडिंग! ही रेसिपी तुमच्या सकाळच्या नाश्त्याला पौष्टिक बनवेल. ओट्समध्ये असणारे फायबर आणि सफरचंदातील जीवनसत्त्वे यांचा समन्वय तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा देईल. विशेष म्हणजे, ही रेसिपी तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि घरातील साध्या साहित्यात बनवली जाते. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही डिश आहे. चला तर मग जाणून घेऊया अॅपल पुडिंग बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.