Healthy Chutney Recipe : लसूण-कोथिंबीरची 'ही' चटणी मजबूत करते इम्युनिटी, ही आहे बनवण्याची सोपी पद्धत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Chutney Recipe

भारतीय खाद्यपदार्थ स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत.

Healthy Chutney Recipe : लसूण-कोथिंबीरची 'ही' चटणी मजबूत करते इम्युनिटी, ही आहे बनवण्याची सोपी पद्धत

Healthy Chutney Recipe : लसणाचे अनेक फायदे आहेत. लसूण कच्चा खाण्याचा सल्ला देखील दिला जातो. पण, हे जरा कठीण आहे नाही का? जर तुम्हाला कच्चा लसूण खाणं शक्य नसेल तर तुम्ही ही चविष्ट चटणी बनवू शकता.

भारतीय खाद्यपदार्थ स्वादिष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. जेव्हा गोष्ट मसाले किंवा चटणी-लोणच्याबद्दल येते, तेव्हा जेवणाच्या ताटात त्याची उपयुक्तता काय याचा विचार केला तर अनेक जण तोंडी लावण्या पुरती असं म्हणून मोकळे होतील; पण हे पदार्थ फक्त चवीपुरती मर्यादित नाहीत.

हजारो वर्षांपासून लसूण औषधात गणलं जातं. हे अन्नाला उत्कृष्ट चव आणण्यासाठी देखील ओळखलं जातं. कच्चा लसूण खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र, अनेक लोकांना ते कच्चे खायला आवडत नाही. तुम्हाला सुद्धा आवडत नसेल तर तुम्ही टेस्टी लसूण चटणी बनवू शकता. ही चटणी पोळी, पुरी, पराठा, वरण-भात, खिचडी अशा कोणत्याही पदार्थासोबत खाता येते.

हेही वाचा: PHOTO : शिवप्रताप दिनी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणं हटवली

साहित्य

 • कोथिंबीर

 • लसूण ४ ते ५ पाकळ्या

 • हिरवी मिरची

 • जिरे

 • मीठ

 • काळे मीठ

 • लिंबू किंवा टोमॅटो

 • बुंदी किंवा शेव (पर्यायी)

हेही वाचा: Pratapgad : अफजलखानाचं उदात्तीकरण! कबरीला मुंबईतून मोगऱ्याचा हार, बॉम्बस्फोटातील आरोपीनंही केला होता मुक्काम

कृती :

 • कोथिंबीर आणि मिरच्या धुवून चिरून घ्या. आता लसूण सोलून स्वच्छ धुवा. टोमॅटो वापरत असाल तर तोही कापून घ्या.

 • आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, मिरची, लसूण टाका. त्यात पांढरे आणि काळे मीठ घाला. त्यात टोमॅटो घाला. त्यात थोडी बुंदी किंवा शेव घाला. त्यात जिरे टाका. आता हे सर्व नीट बारीक करुन घ्या.

 • जर तुम्ही टोमॅटो घालत नसाल तर बारीक केल्यानंतर थोडे लिंबू घाला. आवश्यक असल्यास यात थोडे पाणी घालू शकता. तुम्हाला हवे असल्यास चव संतुलित करण्यासाठी तुम्ही अर्धा चमचा साखर देखील घालू शकता.

हेही वाचा: कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

नक्की फायदे काय?

या चटणीमध्ये लसूण, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबू, काळे मीठ आणि जिरे आहे. या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. लसूण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लसणात आढळणारी संयुगे रक्तदाब कमी करतात. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी होतो. लसूण आणि कोथिंबीर देखील तुमचे शरीर डिटॉक्स करते.