Pratapgad : अफजलखानाचं उदात्तीकरण! कबरीला मुंबईतून मोगऱ्याचा हार, बॉम्बस्फोटातील आरोपीनंही केला होता मुक्काम

या कबरीला दररोज मुंबईहून मोगऱ्याचा हार पाठवला जात होता.
Afzal Khan Kabar Pratapgad
Afzal Khan Kabar Pratapgadesakal
Summary

या कबरीला दररोज मुंबईहून मोगऱ्याचा हार पाठवला जात होता.

Afzal Khan Kabar Pratapgad : सन 1990 पासून वादात असलेल्या अफजल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमणं आज (गुरुवार) काढून टाकण्यात आली. अफजल खानाची कबर काही फूट जागेत होती, त्याठिकाणी वन विभागाच्या हद्दीत एकरभर जागेत ही अतिक्रमणं होती.

याठिकाणी अफजल खानाचं (Afzal Khan) उदात्तीकरण केलं जातं असल्याची तक्रार होत होती. हे अतिक्रमण काढावं या मागणीसाठी 2006 मध्ये तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळीपासून अफजल खान कबरीकडं प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी गेली 26 वर्षे 144 कलम लागू आहे. या कबरीजवळ नेहमी चोख बंदोबस्त ठेवला आहे. 2017 ला एका निकालाद्वारे सर्वोच्च न्यायालयानं हे अतिक्रमण काढण्यात यावं, असे आदेश दिले होते. मात्र, तरीही अतिक्रमण पाडण्यात आलं नव्हतं. आज अत्यंत गोपनीयता पाळत ही अतिक्रमणं काढण्यात आली आहेत.

अफजल खान कबरीचा इतिहास

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) फाडला. त्यानंतर अफजल खान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा (Sayyed Banda) याची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी बांधण्यात आली. सहा फुटांच्या या कबरीवर 1956 पर्यंत कौलारू छप्पर असल्याचे उल्लेख आढळतात. 1980 ते 1985 दरम्यान याठिकाणी अतिक्रमण सुरू झालं. सुरवातीला उरुस भरवून अफजल खानाचं उदात्तीकरण करण्यात आलं तर याठिकाणी उभा करण्यात आलेल्या दर्ग्याचं दर्शन घ्यायची सक्ती काही फकिर करत असल्याच्या तक्रारी अनेक जण करत होते.

Afzal Khan Kabar Pratapgad
Pratapgad : अफजलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणं हटवली; पहाटेपासून हालचाली सुरू

कबरीला मुंबईहून यायचा मोगऱ्याचा हार

याठिकाणी भरण्यात येणाऱ्या उरुसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले जात होते, अशीही तक्रार अनेक जण करतात. या कबरीला दररोज मुंबईहून (Mumbai) मोगऱ्याचा हार पाठवला जात होता. 1990 च्या अगोदर याठिकाणी वन विभागाच्या जागेत खोल्या बांधण्यात आल्या. या खोल्यामध्ये 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी राहिल्याचा आरोपही होता.

Afzal Khan Kabar Pratapgad
PHOTO : शिवप्रताप दिनी मोठी कारवाई; अफजलखानाच्या कबरीजवळची अतिक्रमणं हटवली

कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय

सन 2006 ला काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं, अशी मागणी केली. सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं ही कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. गेली 26 वर्षे या ठिकाणी सामान्य नागरिकांना जाता येत नाही, हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com