Jowar Chilla Recipe: तुम्हालाही नेहमी वाटतं का, "आज नाश्त्याला काय वेगळं करायचं?" नेहमी तेच उपमा, पोहे किंवा ब्रेड खाऊन कंटाळा आला असेल, तर ही झटपट आणि पौष्टिक ज्वारीचं घावनाची रेसिपी तुमच्यासाठी एकदम योग्य आहे. .ज्वारी हे सुपग्रेन मानलं जातं, कारण ते फायबर्स, प्रोटीन आणि अनेक पोषकतत्वनी भरलेलं असतं. हे घावन केवळ पौष्टिकच नाही, तर अतिशय हलकं, पचायला सोपं आणि झटपट तयार होणारं पदार्थ आहे. चला तर जाणून घेऊया याची रेसिपी.Rawdogging Flights: ना पुस्तक, ना संगीत, ना मुव्ही... काय आहे Raw-Dogging फ्लाइट ट्रेंड? लांबच्या प्रवासाच्या फ्लाइटमध्ये हळू हळू फॉलो होतोय.साहित्य:घावन२ कप ज्वारीचं पीठ१/४ कप तांदळाचं पीठ१/४ हळद१ चमचा धणे पावडर१ चमचा लाल तिखट१/४ जिरं आणि ओवाचवीनुसार मीठआलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचाबारीक चिरलेली मेथीथोडं तेल (तव्यावर शेकण्यासाठी).कृतीएका मोठ्या परातीत ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करा.त्यात हळद, धणे पावडर, तिखट, जिरं-ओवा, मीठ आणि ठेचा घाला.चिरलेली मेथीही त्यात मिसळा.सगळं एकत्र करून त्यात थोडं थोडं पाणी घालून पातळसर (डोशाच्या पिठासारखं) मिश्रण तयार करा.मिश्रणात गुठळ्या राहू देऊ नका नीट फेटून घ्या.नॉनस्टिक तवा गरम करा. त्यावर थोडं तेल घालून मिश्रण थोडंसं ओतून पसरवा (उत्तप्पा किंवा डोशासारखं).झाकण ठेवून मध्यम आचेवर शेकून घ्या. दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजा.गरम गरम घावन तयार.Vasubaras 2025 Rangoli Designs: वसुबारसच्या दिवशी अंगणात काढा सुंदर अन् आकर्षक रांगोळी, पाहा 'या' सोप्या डिझाईन्स.चटणी१ मध्यम कांदा१/४ वाटी फुटाणे२/४ वाटी शेंगदाण्याचं कूटलसूण, आलं, चिंच (चवीनुसार)३ हिरव्या मिरच्याथोडी कोथिंबीरकृतीफुटाणे व शेंगदाण्याचं कूट कोरडं थोडं भाजून घ्या (फ्लेवर वाढतो).कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, चिंच, भाजलेले फुटाणे आणि शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये टाका.थोडं पाणी घालून बारीक वाटा.वरून कोथिंबीर घालून परत थोडं फिरवा.हवी असल्यास फोडणी (मोहरी-जिरं-हिंग-तेल) देऊ शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.