

Healthy Breakfast Recipe
Sakal
how to make healthy jowar omelette at home: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. त्यामुळे तो पौष्टिक, हलका आणि पोटभर असणे गरजेचे आहे. अनेकदा ऑफिसला जायची घाई असल्याने आपण ब्रेड, बिस्किटे किंवा बाहेरचे पदार्थ खाऊन दिवसाची सुरुवात करतो, पण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही.
अशावेळी ज्वारीसारख्या पौष्टिक धान्याचा वापर करून बनवलेले ज्वारी ऑम्लेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ज्वारीमध्ये फायबर, प्रोटीन, लोह आणि इतर आवश्यक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जे पचन सुधारण्यास आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. हा पदार्थ १५ मिनिटांत तयार होतो. ज्वारी ऑम्लेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.