हेल्दी रेसिपी : कटाची आमटी

शिल्पा परांडेकर
Tuesday, 17 March 2020

कटाची आमटी वा सार आपण डाळीच्या पाण्यापासून बनवितो. हरभऱ्याची डाळ बलवर्धक व स्नायूवर्धक आहे.

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक मानाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. त्यातही, विशेषतः पुरण. पुरणापासून पोळी व्यतिरिक्त दिवे, मांडे, दिंडे, मोदक, कानवले किंवा कडबू असे अनेक पदार्थ होतात.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुरण रुचकर, चविष्ट असण्यासोबतच त्वरित उष्मांक प्रदान करणारे आहे. आपण आज बोलूयात आमटीविषयी. कटाची आमटी वा सार आपण डाळीच्या पाण्यापासून बनवितो. हरभऱ्याची डाळ बलवर्धक व स्नायूवर्धक आहे. प्रथिने, जीवनसत्वे व अनेक क्षारांनी युक्त आहे. बऱ्याचदा हा प्रश्न असतो की, एखाद्या पदार्थात मसाले असतील तर तो पदार्थ ‘हेल्दी’ कसा असेल? अनेक मसाले वजन घटवण्यासाठी मदत करतात. तूर्तास कटाची आमटी करून तिचा आस्वाद घ्या. अर्थातच प्रमाणात.

एक वाटीसाठी...
साहित्य : वाटण – तीळ, खसखस (प्रत्येकी १/२ चमचा), खोबरे (छोटा तुकडा), लवंग (४ ते ५), दालचिनी (१ पेर), छोटा कांदा (गॅस वर भाजून), लसूण (४ ते ५ पाकळ्या).

पुरणाचा छोटा गोळा किंवा शिजलेली डाळ, चिंच किंवा आमसूल, मीठ, मिरची पूड, गूळ (आवश्यकतेनुसार) जिरे-मोहरी, कोथिंबीर.

कृती
१.  सर्व मसाले, कांदा गॅसवर भाजून घ्यावा.
२.  डाळ गॅसवर मध्यम आचेवर शिजवावी.
३.  कट म्हणजेच डाळीचे वरचे पिवळसर पाणी २-३ वेळा किंवा गरजेनुसार काढून घ्यावे.
४.  फोडणी करून तयार वाटण परतून घेणे.
५.  डाळीचे पाणी, पुरणाचा गोळा, तिखट, मीठ, गूळ घालणे.
६.  साधारण उकळी आली की चिंच घालून उकळणे.
७.  शेवटी वरून कोथिंबीर घालावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipe curry recipe

Tags
टॉपिकस
Topic Tags: