हेल्दी रेसिपी : पचनास हलका गव्हाचा कोंडा

शिल्पा परांडेकर
Tuesday, 19 May 2020

‘‘माय, येतील का गं ते दिवस परत?’’, ‘‘तू ही समदी माहिती घेऊन काय करणार हायस? जुनं आता कुणाला बी नको हायं.’’ अनेक गावांमधील आजी मला असे प्रश्न विचारायच्या. ‘‘आजी, पूर्वीसारखेच दिवस येतील की नाही माहीत नाही, पण आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास आपल्याकडचा हा ठेवा थोड्याफार प्रमाणात नक्कीच जतन होईल,’’ मी म्हणायचे.

‘‘माय, येतील का गं ते दिवस परत?’’, ‘‘तू ही समदी माहिती घेऊन काय करणार हायस? जुनं आता कुणाला बी नको हायं.’’ अनेक गावांमधील आजी मला असे प्रश्न विचारायच्या. ‘‘आजी, पूर्वीसारखेच दिवस येतील की नाही माहीत नाही, पण आपण सर्वांनी प्रयत्न केल्यास आपल्याकडचा हा ठेवा थोड्याफार प्रमाणात नक्कीच जतन होईल,’’ मी म्हणायचे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘आत्मनिर्भर भारत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेला विचार माझ्यासारख्या भारतीय संस्कृती, कला, आहारशास्त्र, तत्त्वज्ञान, आयुर्वेद, स्वदेशी वस्तू अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांसाठी व आपल्या सर्वांसाठीच एक आदर्शवादी मार्ग आहे. त्या अनुषंगानेच आहाराबाबत एक वेगळा विचार मांडतेय. उत्तम आरोग्याची सुरुवात ही आपल्या गच्च्चीपासून होणार आहे.

म्हणजे आपल्याला लागणारा भाजीपाला घरीच पिकवायचा आणि तोही घरातील ओल्या कचऱ्याचा वापर करून. यातून काय होईल की, आपण लहानपणापासून खात आलेल्या, आपल्या आवडीच्या भाज्या खाऊ शकतो. शिवाय या भाज्या पूर्णपणे सेंद्रिय व ऋतुमानानुसारच पिकतील. त्यामुळे खतांच्या अतिवापरामुळे होणारे आजार टळतील. शिवाय ऋतुमानानुसार आहार घेतल्यामुळे आरोग्यही ठणठणीतच राहील. या संकल्पनेचा खोलवर विचार केला व सर्वांनी हातभार लावल्यास समाजाला भेडसावणाऱ्या ‘कचऱ्याच्या’ समस्येचीही विल्हेवाट लावणे सोपे होईल आणि हे ‘आत्मनिर्भर’ प्रवासातील आपले पहिले पाऊल असेल.

आता वळूयात या ऋतूतील खास रेसिपीकडे. सध्या गव्हाच्या कुरडया आणि त्याचा कोंडाही तयार झाला असेल. (आजकाल हा कोंडा बाजारातही उपलब्ध झाला आहे.) गव्हाचा कोंडा गव्हाच्या पिठाच्या तुलनेत पचनास सोपा आहे. बद्धकोष्ठता व पोटांच्या काही तक्रारींवर उपयुक्त. तसेच कमी उष्मांक व पोटभरू असल्यामुळे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त. (ओट्स ब्रॅनला व्हीट ब्रॅन अर्थात गव्हाचा कोंडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो.)

साहित्य :  गव्हाचा कोंडा, मीठ, तिखट, कांदा, लसूण. फोडणीसाठी – तेल, जिरे-मोहरी, हिंग, कडीपत्ता.
कृती : १. फोडणी करून कांदा-लसूण परतणे.
२. तिखट, मीठ, हळद, कोंडा एकत्रित परतणे व किंचित पाणी घालून मंद आचेवर शिजवणे.
टीप  : १. कोरडा कोंडा असल्यास थोडा भिजवून घ्यावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipe Gavhyacha Konda