

palak paratha recipe,
Sakal
Easy spinach paratha recipe at home: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ठरवणारा महत्त्वाचा भाग असतो. जर नाश्ता हेल्दी आणि टेस्टी असेल, तर संपूर्ण दिवस उत्साही आणि फ्रेश वाटतो. रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर पालक पराठा नक्की ट्राय करु शकता. हिरव्या पालकातून मिळणारे लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. विशेष म्हणजे पालक पराठा बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही. सकाळी घाई असताना ही रेसिपी झटपट तयार होते, त्यामुळे ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी निघण्याआधी उत्तम नाश्ता करता येतो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा पराठा आवडेल. चला तर मग हा पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.