

Healthy Tiramisu Chia Pudding Recipe: Easy & Guilt-Free Breakfast
esakal
Healthy Tiramisu Chia Pudding Recipe: तिरामिसू केकची चव कोणाला आवडत नाही? अप्रतिम चव आणि क्रीमी पणामुळे डेझर्टप्रेमींमध्ये तिरामिसूचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. पण, बदलत्या जीवनशैलीत आणि नवीन वर्षाच्या हेल्थ रिझोल्युशनच्या प्रवासात कॅलरीजच्या भीतीपोटी अनेकदा गोड पदार्थ टाळावे लागतात. जर तुम्हालाही डाएट सांभाळून तिरामिसूच्या भन्नाट चवीचा आनंद घ्यायचा असेल, तर 'तिरामिसू चिया पुडिंग' (Tiramisu Chia Pudding) हा तुमच्यासाठी उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो.
कॉफीचा समृद्ध सुवास आणि कोको पावडरची अप्रतिम चव एकत्र मिळून तयार होणारा हा पदार्थ केवळ ब्रेकफास्टसाठीच नाही, तर दिवसाच्या कोणत्याही वेळी खाण्यासाठी एक परिपूर्ण पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊया हे टेस्टी आणि न्युट्रिशिअस चिया पुडिंग कसे तयार करावे आणि त्यासाठी कोणते साहित्य लागते-