

Easy Soyabean Recipe,
Sakal
Easy Soyabean Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसाची सुरुवात ठरवतो. अनेकदा वेळेअभावी आपण बाहेरचं किंवा तयार पदार्थांवर अवलंबून राहतो, पण थोड्याशा नियोजनाने घरच्या घरी हेल्दी आणि चविष्ट नाश्ता तयार करता येतो. अशाच एका झटपट आणि पौष्टिक रेसिपी म्हणजे सोयाबीन चिल्ली आहे. फक्त 15 मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी प्रोटीनने समृद्ध असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
सोयाबीनमध्ये असलेली प्रोटीन, फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्वं शरीराला ऊर्जा देतात आणि पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ही रेसिपी उत्तम आहे. एकदम हॉटेल स्टाइल लागणारी ही सोयाबीन चिल्ली सकाळच्या घाईतही सहज तयार करता येते. चला तर मग सोयाबीन चिल्ली बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे जाणून घ्या.