

Low Calorie, Diabetes and PCOS Friendly Ragi Thalipeeth
sakal
High Protein & Calcium Rich Marathi Breakfast Recipes: दिवसाची सुरुवात चांगली व्हायची असेल, तर सकाळचा नाश्ता पौष्टिक असणं खूप गरजेचं आहे. अशा वेळी नाचणीचं थालीपीठ हा चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. नाचणीमध्ये कॅल्शियम, फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यात मूगडाळ, गाजर, कांदा, कोथिंबीर आणि इतर भाज्या घातल्यामुळे त्याची पौष्टिकता आणखी वाढते. हे थालीपीठ खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरलेलं राहायला मदत होते. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी उत्तम नाश्ता ठरू शकते.