

Winter Special Broccoli Soup Recipe
sakal
HIGH PROTEIN WINTER RECIPES: हिवाळ्याची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि या दिवसांत गरमागरम, पौष्टिक पदार्थ खाण्याची मजा काही औरच असते. अशावेळी नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी हटके आणि आरोग्यदायी बनवायचं असेल, तर ब्रोकली सूप आणि क्रीमी टोस्टची ही रेसिपी नक्की ट्राय करा. ब्रोकली, कांदा, लसूण आणि फेटा चीजपासून तयार होणारं हे सूप चवीला स्वादिष्ट असून लो-कार्ब पर्याय आहे. तर हंग कर्ड, काकडी आणि पुदिन्यापासून बनवलेला क्रीमी डिप टोस्टची चव आणखी वाढवतो. बनवायला सोपी आणि पौष्टिक अशी ही रेसिपी थंडीच्या दिवसांत नाश्ता असो वा संध्याकाळची हलकी भूक; दोन्हीसाठी हे उत्तम ठरेल!