पुरणपोळी आवडते! त्याचे आरोग्याला होणारे फायदे वाचा| |Holi Puranpoli Benefits For Health | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Holi Puranpoli Benefits For Health
पुरणपोळी आवडते! त्याचे आरोग्याला होणारे फायदे वाचा|Holi Puranpoli Benefits For Health

पुरणपोळी आवडते! त्याचे आरोग्याला होणारे फायदे वाचा

होळीला आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. महाराष्ट्रातल्या अत्यंत लोकप्रिय असा हा पदार्थ आहे. पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. थंडी सरलेली असते आणि उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झालेली असते. या काळात पुरणपोळी खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. गव्हाचे, मैदा, हरभऱ्याची डाळ, गूळ, वेलची, जायफळ असे घटक एकत्र करून पुरणपोळी केली जाते. यातील प्रत्येक घटकात स्वत:चे गुणधर्म आहेत. त्यामुळे हे घटक एकत्र झाल्याने शरीराला चांगले फायदे होतात.

असे आहेत फायदे

गव्हाचे पीठ आरोग्यासाठी चांगले असते. काही जण मैदा वापरतात. पण मैदा शरीरासाठी चांगला नसल्याने तुम्ही फक्त कणीक वापरून पुरणपोळी करू शकता. त्यामुळे हा पदार्थ आणखी पौष्टीक होईल. गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरण पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. तसेच अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो.

Puranpoli

Puranpoli

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. वेलची, केशर, जायफळ पावडर हे घटक पचन आणखी वाढवतात. त्यामुळे पुरणपोळी खाऊन शरीराला या काळात फायदाच होतो.

Web Title: Holi Puran Poli Eating Health Benefit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top