Holi Recipe: होळी स्पेशल  भांगेच्या पानांची कुरकुरीत भजी कशी तयार करायची?

होळी स्पेशल भांगेच्या पानांची कुरकुरीत भजी
Holi Recipe Crispy Bhaji
Holi Recipe Crispy BhajiEsakal

होळी या रंगांच्या उत्सवात घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक पदार्थ बनवले जातात, जे केवळ चांगले दिसतात असे नाही, तर ते अतिशय चवदार देखील असतात. आजच्या लेखात आपण होळी स्पेशल भांगेच्या पानांची कुरकुरीत भजी कशी तयार करायची याची सविस्तर रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य

एक कप बेसन

दोन चिमूट मीठ

पाव चमचा हळद

अर्धा चमचा लाल तिखट 

एक चमचा आमचुर पावडर

ओवा 

तिळ

एक चमचा भांगेच्या पानांची पेस्ट

उभा चिरलेला कांदा

बटाटे काप

Holi Recipe Crispy Bhaji
Holi Recipe: होळी स्पेशल कटाची आमटी कशी तयार करतात?

कृती

सर्वप्रथम बेसन, मीठ, हळद, लाल तिखट याचं मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात थोडसं तेल घालुन तिळ,ओवा आमचुर पावडर आणि पाणी टाकून भजी तळण्याइतपत मिश्रण सैलसर करावे.नंतर या मिश्रणात कांदे आणि बटाट्याचे काप टाकावे. कढईत तेल गरम करा आणि भजी त्यात सोडा आणि कुरकुरीत तळून घ्या. होळी खेळून झाल्यावर गरमागरम चविष्ट भजी खाण्यात वेगळाच आनंद मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com