
पावसाळ्यात पाणीपुरी खायचं टेन्शन आहे? घरीच बनवा हेल्दी आणि टेस्टी पाणीपुरी
पाणीपुरी ही प्रत्येकाला आवडते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पानीपुरी प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पावसाळ्यात अनेकदा आपल्याला उघड्यावरचे खायला मनाई केली जाते. कारण असं खाणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. पण पावसाळा असो किंवा उन्हाळा किंवा हिवाळा पाणीपुरीचा मोह कुणालाच आवरता येत नाही.
सध्या पावसाळा सुरु आहे आणि साथीचे रोग वाढले आहे. त्यामुळे बाहेरचे खाणे आपण सर्वांनी टाळणे गरजेचे आहे. त्यात जर तुम्हाला पाणीपुरी खावीशी वाटत असेल तर तुम्ही घरबसल्या पानीपुरीचा आस्वाद घेऊ शकता.
हेही वाचा: Food recipes : घरच्या घरी बनवा मसाले भात, अगदी पंगतीत असतो तसाच...
अनेकदा घरी पाणीपुरी बनवताना पाणीपुरीचे पाणी कसे टेस्टी बनवावे, हे कळत नाही. पण आज आम्ही तुम्हाला आज खास पानीपुरीचे पानी कसे बनवावे, हे सांगणार आहोत.
साहित्य
६ ते ७ मोठे कप पाणी, थोडासा पुदिना
लिंबाएवढी चिंच,
२-३ हिरव्या मिरच्या
लहानसा आल्याचा तुकडा
१ चमचा जिरे, २,३ लवंगा
चमचा मिरपूड
थोडे लाल तिखट
थोडा गूळ
मीठ
३ लिंबाचा रस
१ वाटी मोड आलेले मूग थोडी हळद घालून वाफवून घ्यावेत.
२/३ उकडलेले बटाटे.
हेही वाचा: Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी
पाणीपुरी पाणीची कृती?
चिंचेचा कोळ तयार करून घ्यावा.
मिरच्या, आले, पुदिना, जिरे, लवंगा, मिरपूड, तिखट, मीठ ह्यांची बारीक चटणी वाटून घ्यावी.
नंतर वाटलेली चटणी चिंचेचा कोळ व गूळ एकत्र करावे.
ह्या पाण्यात एका लिंबाचा रस घालावा, म्हणजे चव फार सुंदर येते.
प्रत्येक पुरी वरच्या बाजूने थोडी फोडून त्यात ८-१० मूग व थोडा बटाट्याचा चुरा भरून व वरील पाण्यात बुडवून प्लेट तयार कराव्यात.
लगेचच खाव्यात. किंवा प्रत्येकाला एका वाटीत थोडेसे तयार पाणी व मूग घातलेल्या ७-८ पुऱ्या द्याव्यात.
Web Title: Home Made Tasty And Healthy Panipuri Recipe
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..