Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी

SUMMER FOOD CARE
SUMMER FOOD CARE

Kitchen Tips: उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होते. तसेच हा ऋतू आरोग्यासाठी अतिशय संवेदनशील असतो. त्यामुळे या काळात अन्नाची विशेष काळजी घ्यावी लागते. जेवण किंवा एखादा पदार्थ तयार केल्यावर तो योग्य वेळी खाणे. उरलेले अन्न लगेच फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे असते. उन्हाळ्यात अनेक घरांमध्ये अन्न खराब होण्याच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे अन्न ताजे ठेवण्यासाठी काय करावे हे अनेक महिलांना सुचत नाही.

SUMMER FOOD CARE
उन्हाळ्यात कांदा खाल्याने होतात ५ फायदे
Food
FoodSakal

या ६ टिप्स लक्षात ठेवा

- उन्हाळ्यात भूक कमी लागते. थोडे जास्त खाल्ले तर पोट बिघडते. या काळात घरात अनेकदा अन्न शिल्लक राहते, त्यामुळे जेवढे अन्न संपेल तेवढेच तयार केले करावे. अन्न शिजवल्यानंतर २ तासांच्या आत खाणे चांगले.

- जेवण उरल्यास ते लगेच फ्रिजमध्ये ठेवणे गरजेचे आहे. जर जास्त वेळ अन्न बाहेर राहिले तर त्यावर बॅक्टेरिया वाढल्याने अन्न झपाट्याने खराब होऊ लागते.

SUMMER FOOD CARE
फ्रिजमध्ये अन्न साठवताना या ५ चुका तुम्ही करता का?
FRIDGE
FRIDGE

- अनेक घरात फ्रिज नसतो. अशावेळी अन्न बराच काळ चांगले राहणे कठीण असते. अशावेळी अन्न जास्त काळ चांगले राहण्यासाठी भांडे थंड पाण्याने भरून त्यात अन्नाचे भांडे ठेवा. यामुळे अन्न दीर्घकाळ खाण्यायोग्य राहील.

- जेवण जर उरले तर सहसा आपण ते उचलून फ्रीजमध्ये ठेवतो. पण असे न करता ज्या भांड्यात उरलेले अन्न आधीच ठेवलेले आहे ते वापरू नये. नवीन भांड्यात अन्न काढून ठेवावे.

SUMMER FOOD CARE
उन्हाळ्यात प्या Detox Drink| Summer Health
Hot Food
Hot Food

- तुम्ही जर ताजे जेवण बनवले असेल आणि लगेच ते खाणार नसाल तरी हरकत नाही. पण गरम जेवण फ्रिजमध्ये ठेवू नका. सामान्य तापमानात जेवण थंड होऊ द्या. मगच ते फ्रिजमध्ये ठेवा.

- उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी ठेवलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करण्याची सवय टाळावी. अन्न सारखे गरम केल्याने त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात. तसेच एक दिवसापेक्षा जास्त जुने अन्न खाणेही टाळले पाहिजे.

SUMMER FOOD CARE
Cucumber For Summer: उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने होतात ४ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com