घरीच बनवा आमचुर पावडर; स्टोअर करण्यासाठी काही खास टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरीच बनवा आमचुर पावडर; स्टोअर करण्यासाठी काही खास टिप्स

घरीच बनवा आमचुर पावडर; स्टोअर करण्यासाठी काही खास टिप्स

कोल्हापूर : भाजी किंवा चटणी चटपटीत बनवण्यासाठी आमचूर पावडरचा वापर केला जातो. आमचूर पावडर मार्केटमध्ये सहजरित्या मिळून जाते. परंतु तुम्ही जर ही घरी बनवणार असाल तर ही पद्धत सोपी आहे. कोरोनाच्या काळात होममेड वस्तू जास्त सुरक्षित आहेत असे मानले जाते. तसेच आमचूर पावडरचे बरेच आरोग्यदायी फायदेही आहेत. वजन कमी करणे, हेल्दी ड्रिंकसाठी याचा वापर केला जातो. जर तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने आमचूर पावडर बनवू शकता. तुम्ही याला योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवले तर हे बरेच दिवस वापरू शकता. तर आज आपण पाहणार आहोत की आमचूर पावडर कशी बनवली जाते.

बनवण्याची पद्धत

सुरुवातीला कच्च्या आंब्यांना धुवून त्याची साल काढून घ्या. आता पाण्यामध्ये सगळे आंबे घाला आणि त्याचे छोटे-छोटे चिप्स, स्लाईस बनवून घ्या. शक्य असल्यास तुम्ही स्लाईस कट करण्याचे मशीनही वापरू शकता. या स्लाईस काळ्या पडू नयेत म्हणून त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवा. आता पाण्यामधून हे तुकडे बाजूला करा आणि संपूर्ण पाणी बाजूला काढून घ्या. आता एका सुती कपड्यांमध्ये हे बांधून ठेवा आणि हे तुकडे वाळवून घ्या. दोन-तीन दिवसांसाठी हे तुकडे वाळवून घ्या. जेव्हा ह्या स्लाईस पूर्णपणे सुकतील तेव्हा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. या स्लाईस वाळण्यासाठी कदाचित तुम्हाला दोन-तीन दिवस लागतील. त्याची बारीक पावडर करुन घेतल्यानंतर त्याम ध्ये चवीनुसार मीठ घाला. पुन्हा एकदा बारीक करून घ्या आता एका बाऊलमध्ये ही पावडर काढून घ्या. ही पावडर बारीक करत असताना आंब्याचे मोठे मोठे तुकडे होऊ शकतात. त्याचा वापर तुम्ही भाजीसाठी करू शकता. काही महिला याचा वापर लोणचे बनवण्यासाठी करतात. तसेच त्याचा वापर तुम्ही चटणी बनवण्यासाठी करू शकता.

loading image
go to top