Bajri Halawa Recipe: बाजरीची भाकरीच नाही तर हलवाही आहे स्वादिष्ट अन् पौष्टिक, जाणून घ्या रेसिपी

बाजरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आपल्याला ठणठणीत ठेवतात.
Bajri Halawa Recipe
Bajri Halawa Recipesakal
Updated on

बाजरी हे एक गरम धान्य आहे ज्याचे सेवन हिवाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते. होय, बाजरीत केवळ फायबरचे प्रमाण चांगले असते असे नाही तर त्यात कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी आणि अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स देखील असतात.

ते शरीरातील टी पेशी निरोगी ठेवतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. अनेक देशांनी त्याचे उत्पादन सुरू केले आहे. जगभरात बाजरीच्या अनेक जाती आढळतात.

आपल्या भारतात बाजरीची लागवड राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उष्ण ठिकाणी केली जाते. बाजरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आपल्याला ठणठणीत ठेवतात. बऱ्याच लोकांना बाजरीची भाकरी खायला आवडते, जी वजन कमी करायला मदत करते आणि कॅलरीज वाढवते.

Bajri Halawa Recipe
Palak Paratha Recipe: ब्रेकफास्टसाठी बनवा हेल्दी पालक पराठा! जाणून घ्या रेसिपी

दररोज 50-200 ग्रॅम बाजरीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायसिग्लिसरॉलच्या पातळीवर मात करून तसेच बॉडी मास इंडेक्स नियंत्रित राहते. त्यामूळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी होतो. ह्या संबंधीचा अभ्यास, पाच संस्थांनी आणि इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी-एरिड ट्रॉपिक्सच्या नेतृत्वाखाली केला होता.

बाजरी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात कॅलरीज, प्रथिने, खनिज फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असे बरेच घटक आहेत. त्यामूळे हिवाळ्यात एनर्जेटीक रहायला बाजरी मदत करते.

बाजरीचा हलवा कसा करायचा

हलवा बनवण्यासाठी बाजरी थोडी गरम करून त्याचे पीठ दळून आणा. एका कढईत एक चमचा तूप टाका आणि बाजरीचे पीठ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यात साखर घातली तरी चालते. पण गुळ घालणे कधीही चांगले. दुसऱ्या एका भांड्यात गुळाचा पाक तयार करा.

Bajri Halawa Recipe
Healthy Oats Recipe : वजन कमी करणाऱ्यांसाठी ओट्स पेक्षा बेस्ट काहीच नाही, या वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा!

बाजरीचे पीठ भाजल्यावर त्याचा खमंग वास येतो. त्यावेळी त्या पिठात गुळाचा पाक घालून चांगले मिक्स करा. त्यावर तूम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता. यावर अजून थोडे तूप आणि पाणी घालू शकता. झाकण ठेऊन ते चांगले शिजू द्या. एक वाफ गेली की गरम गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com