Healthy Oats Recipe : वजन कमी करणाऱ्यांसाठी ओट्स पेक्षा बेस्ट काहीच नाही, या वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा!

Oats Recipe for Weight Loss: ओट्स खाल्ल्याने तुमचे फॅट वाढत नाही
Healthy Oats Recipe for Weight Loss
Healthy Oats Recipe for Weight Lossesakal

Healthy Oats Recipe : हॉस्टेलवर राहणारी निलम दिवसेंदिवस जाड होत होती. तिचं खाणंही वेळीअवेळी होतं त्यामुळेच वजन कमी होत होतं. २३ वर्षांच्या निलमची आई मात्र यामुळं काळजीत होती.

हॉस्टेलला राहणारी पोर नीट नाश्ता,जेवण करत नाही, असंच तिला वाटायचं. पण, तसं नव्हतं. निलम रोज नाश्ता करायची पण तो पौष्टीक नसायचा. यामुळेच निलमचं वजन वाढतच होतं. मग तिच्या आईने यावर सोल्युशन म्हणून ओट्सबद्दल निलमला माहिती दिली.

ओट्स हे खाण्यासाठी पौष्टीक आहेत. ते बनवायला फारसा वेळही जात नाही. त्यामुळेच ऑफिसच्या धावपळीत ओट्स तुमचं पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतं. आणि तुम्हाला पोषणही देतं. ओट्समध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. तुम्ही ओट्स दुधासोबत, ड्रायफ्रुट्ससोबत आणि 5 मिनिटांत दलिया बनवूनही खाऊ शकता.(Healthy Oats Recipe : Include Oats in breakfast in these 3 ways, it is also beneficial for people with diabetes and weight loss)

Healthy Oats Recipe for Weight Loss
Oats Chilla Recipe : डाएट करणाऱ्यांनी नाश्त्यात खावा ओट्स चिला; वजन होणार झटक्यात कमी

केवळ दुधासोबत नाहीतर ओट्सच्या काही हटके रेसिपीजही तुम्हाला बनवता येतील. ओट्सचे ऑमलेट, ओट्सपासून बनलेला उपमा या रेसिपीज आज आपण पाहुयात.

ओट्स एग ऑम्लेट रेसिपी

ओट्स एग ऑम्लेट ओट्स एग ऑम्लेट बनवायला जितके सोपे आहे तितकेच ते खाण्यासही फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, तुम्हाला फक्त 2 अंडी फोडायची आहेत, 2 चमचे ओट्स, कांदे आणि हिरव्या मिरच्या कापून मिक्स करावे लागेल. वर थोडे मीठ, मिरपूड आणि लाल तिखट घाला. आता सामान्य ऑम्लेट प्रमाणे तव्यावर बनवा. आणि गरम असताना सर्व्ह करा. (Omelet Recipe)

ओट्स डोसा

डोसा तर तुम्ही खाल्ला असेल पण आज आपण ओट्सचा डोसा कसा बनवतात ते पाहु. हा डोसा बनवायला खूप सोपा आहे.  1 वाटी ओट्स 1 वाटी दही आणि थोडासा बेकिंग सोडा एकत्र बारीक करायचा आहे. त्यानंतर ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ बनवून फुगण्यासाठी ठेवा आणि अर्धातासाने त्याचे डोसे बनवा. त्यात तुम्ही मीठ आणि वेगवेगळ्या भाज्याही घालू शकता. ज्यामुळे तो आणखी पौष्टीक होईल. (Dosa Recipes)

Healthy Oats Recipe for Weight Loss
Oats Bhurji Recipe : सकाळी नाश्त्याला खा हेल्दी फुड; ओट्स आणि अंड्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा

ओट्स उपमा

फक्त रव्याचा उपमा खाल्लेल्या लोकांसाठी हे नावंच नवं आहे. ओट्सचाही उपमा बनवता येतो हे फार कमी लोकांना माहितीय. या उपम्यात तुम्ही गाजर, आणि कोवळा वटाणाही घालू शकता.यासाठी ओट्स भिजवा, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊन त्यात ओट्स परतून घ्या, भाज्याही घाला आणि गरम पाणी घालून ते व्यवस्थित शिजवून घ्या.  (Oats Upma)

ओट्स आरोग्यासाठी फायद्याचे आहे. ज्यांना Weight Loss करायचा आहे अशांसाठी तर हा पदार्थ वरदानच आहे. कारण ओट्स खाल्ल्याने तुमचे फॅट वाढत नाही, उलट तुम्हाला भूकही कमी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com