New Year Celebration : न्यू इयर पार्टीसाठी 15 मिनिटांमध्ये बनवा चीज बॉल्स, एकदम सोपी आहे रेसिपी

नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करतात तर काही जण घरच्या घरी एखाद्या छोट्या पार्टीचे देखील आयोजन करतात आणि न्यू इयर सेलिब्रेट करतात.
New Year Celebration
New Year Celebrationesakal

New Year Celebration : अवघ्या २ दिवसांवर नवीन वर्ष येऊन ठेपले आहे. या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण उत्सुक असतात. या नव्या वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक जण फिरायला जाण्याचा देखील प्लॅन करतात तर काही जण घरच्या घरी एखाद्या छोट्या पार्टीचे देखील आयोजन करतात.

एकूणच काय प्रत्येक जण आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्साही असतो. काहीजण मित्रांसोबत बाहेर पार्टी करायला जातात तर काही जण घरच्या घरी आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मंडळींसोबत पार्टी करतात.

जर तुम्ही देखील घरच्या घरी पार्टीचे आयोजन केले असेल, तर या न्यू इयर पार्टीसाठी घरच्या घरी स्टार्टरमध्ये तुम्ही चीज बॉल्स बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या चीज बॉल्सची रेसिपी.

New Year Celebration
Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा पौष्टिक बाजरीची इडली, एकदम सोपी आहे रेसिपी

चीज बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे

  • ३ चीज क्यूब्स

  • अर्धा कप मैदा

  • हिरव्या मिरचीची पेस्ट

  • ब्रेडचा चुरा अर्धा कप

  • आल्याची पेस्ट

  • पाणी आवश्यकतेनुसार

  • बटर २ चमचे

  • कोथिंबीर गार्निश करण्यासाठी

  • तेल २ कप

  • १ कप दूध

  • कॉर्नफ्लोअर २ चमचे

चीज बॉल्स करण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • एका बाऊलमध्ये मैदा चाळून घ्या. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करायला ठेवा.

  • पॅन गरम झाल्यानंतर मैदा चांगल्या प्रकारे भाजून घ्या.

  • मैद्याचा वास आल्यानंतर गॅस बंद करा.

  • आता एका मोठ्या भांड्यामध्ये मैदा घ्या. त्यानंतर, त्यात दूध, चीज, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ आणि बेकिंग सोडा घाला.

  • आता या मिश्रणात थोडे पाणी घालून पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्या.

  • या पीठामध्ये तुम्ही तांदळाचे पीठ देखील मिक्स करू शकता. आता या पीठाचे छोटे चीज बॉल्स बनवून घ्या.

  • त्यानंतर, एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स करून त्याची स्लरी बनवा.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल घालून कढई गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, चीज बॉल्स स्लरीमध्ये डिप करा आणि ब्रेडच्या चुऱ्यामध्ये ते लपेटून घ्या. त्यानंतर, चीज बॉल्स तेलात तळून घ्या.

  • आता तुमचे खमंग चीज बॉल्स तयार आहेत.

  • टोमॅटो सॉससोबत हे चीज बॉल्स सर्व्ह करा.

New Year Celebration
New Year 2024 : ख्रिसमस आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी भारतातील ‘या’ समुद्रकिनाऱ्यांची करा निवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com