Recipe : फक्त 2 मिनीटांत बनवा हैदराबादी स्पॉट इडली; ट्राय करा सोपी रेसीपी

ही एक मसालेदार, स्वादिष्ट आणि फक्त दोन मिनिटांत बनवता येणारी रेसिपी आहे.
hyderabad's popular spot idli in 2 minutes
hyderabad's popular spot idli in 2 minutes
Summary

ही एक मसालेदार, स्वादिष्ट आणि फक्त दोन मिनिटांत बनवता येणारी रेसिपी आहे.

सकाळी लवकर उठून कुटूंबियांसाठी नाश्त्याचे नियोजन करावे लागते. प्रत्येक महिलेच्या दैनंदिन कामापैकी हे एक महत्वाचे काम असते. अशावेळी झटपट तयार होणारे शिरा, उपमा किंवा पोहे असे काही पदार्थ बनवले जातात. काहीवेळा नाश्ता वेळेत तयार नाही झाला तर घरचे सदस्य नाश्ता न करता ऑफिसला निघून जातात. मात्र नाश्ता न करता उपाशी पोटी बाहेर पडल्याने अॅसिडीचा त्रासही उद्भवू शकतो. (hyderabad's popular spot idli in 2 minutes)

सकाळी सकस आणि पौष्टिक जेवण किंवा नाश्ता घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते, असे तज्ज्ञ सांगतात. मात्र अनेक गृहिणींना झटपट पदार्थ कोणता बनवावा याचं कोडं असतं. तुम्ही नाश्तासाठी अनेकवेळा टोस्ट किंवा कडधान्यांपासून झटपट होणारे काही पदार्थ बनवू शकता.

hyderabad's popular spot idli in 2 minutes
Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी ओव्याचा चहा फायदेशीर, पाहा कसा ते..

अशा झटपट पदार्थांमध्ये तुम्ही तवा स्पॉट इडलीचाही समावेश करु शकता. ही एक मसालेदार, स्वादिष्ट आणि फक्त दोन मिनिटांत बनवता येणारी रेसिपी आहे. ही झटपट तयार होणारी आणि पटकन संपून जाणारी तसेच मुलांना आवडणरी रेसिपी कशी तयार करावी हे आपण पाहणार आहोत..

स्पॉट इडली 2 मिनिटांत कशी बनवावी?

  • या डिशसाठी तेल, कांदा, हिरवी मिरची, आले आणि लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, सांबार मसाला, हिरवे धणे, रवा आणि दही आवश्यकतेनुसार घ्या.

  • प्रथम तेल गरम करून त्यात कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून हे सर्व एकत्र शिजवून घ्या. टोमॅटो आणि मीठ घालून मंद आचेवर शिजवा. हिरवी धणे, सांबार मसाला घालून एकत्र करा.

  • दरम्यान, एका भांड्यात रवा, दही, मीठ, तेल घालून जाडसर पीठ तयार करा. आवश्यक असल्यास पाणी घाला. पिठात मीठ घाला.

  • आता टोमॅटो-कांदा मिश्रणाचे चार भाग करा. या चार मिश्रणात पीठ टाका आणि एक मिनिट शिजवा. बाजू पलटी करून थोडा वेळ शिजवून गरमागरम सर्व्ह करा. तयार आहे तुमची गरमा गरम स्पॉट इडली.

hyderabad's popular spot idli in 2 minutes
झटपट नाश्ता बनवायचा? ट्राय करा दडपे पोहे, वाचा सोपी रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com