Chicken Recipe: तोंडातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही येवढे टेस्टी बनले चिकन; जाणून घ्या रेसिपी

आज आपण झटपट ढाबास्टाईल चिकनची रेसिपी पाहणार आहोत.
chicken recipe
chicken recipe
Updated on

भारतामध्ये खवय्येंची काही कमी नाही. विशेष करुन या खवय्यांमध्ये मासांहाराची यादी शाकाहारीच्या तुलनेत मोठी आहे. याचा अनुभव आपल्याला अनेकदा आले असले. कोणीही पावणा-रावळा असुदे मासांहाराचा बेत हा ठरलेलाच असतो. खरा पाहुणचार हा मांसाहरी जेवणातच असतो असं बहुतांश लोक म्हणताना दिसतात.

मग ते चिकन असो वा मटण. अनेक प्रकर आपण चाखले आहेत. तर आज आपण झटपट ढाबास्टाईल चिकनची रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपीनुसार तुम्ही जर चिकन घरी बनवले तर तोंडातुन पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

chicken recipe
Rava Uttapam Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा रवा उत्तापा, जाणून घ्या रेसिपी

तर साहित्य

अंदाजे एक किलो चिकन

४ कांदे

किसलेलं सुकं खोबरं

धणे

खसखस

तमालपत्रं

वेलची

लवंगा

मिरी

सुक्या लाल मिरच्या

शहाजिरं

लाल तिखट

तेल

बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार मीठ

chicken recipe
Navratan Korma Recipe: लंच असो वा डिनर हॉटेल सारखा नवरतन कुर्मा आता घरीच बनवा

कृती

चिकनला लावण्यासाठीचा मसाला आधी तयार करून घ्या. त्यासाठी १०-१२ लसूण पाकळ्या, दीड इंच आलं, २ मिरच्या, एक वाटी कोथिंबीर हे सगळं बारीक वाटून घ्या. चिकनला साधारणपणे तासभर हे वाटण आणि हळद, मीठ, दही लावून मुरवत ठेवा. आता कढईत थोड्या तेलावर लांब चिरलेला कांदा खमंग लाल होईपर्यंत परतून बाजूला ठेवा. आता त्याच कढईत सुकं खोबरं भाजून बाजूला ठेवा.

नंतर थोड्या तेलावर धणे, मिरच्या, खसखस आणि गरम मसाला चांगला भाजून घ्या. हे साहित्य आता थंड होऊ द्या. त्यानंतर प्राधान्याने कोरडा मसाला वाटून घ्या. त्यात परतलेला कांदा घाला आणि मिक्सरमधे किंचित पाणी घालून हे मिश्रण अगदी बारीक होईपर्यंत फिरवून घ्या. हा मसाला बाजूला काढून ठेवा.

chicken recipe
Chicken Tikka Pizza Recipe: बर्थडे बॉय एम एस धोनीला आवडतो चिकन पिझ्झा, जाणून घ्या रेसिपी

त्यासाठी एका पातेल्यात तेल गरम करा. त्यात मसाला लावून मुरत ठेवलेले चिकनचे तुकडे घाला. मध्यम आचेवर नीट परतून घेतलेले चिकनचे तुकडे व्यवस्थित शिजवून घ्या.

चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये वाटलेला मसाला, आवडीनुसार लाल तिखट आणि मीठ घाला त्यानंतर हे एकजीव करा. झाकण ठेवून मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटं शिजू द्या. आपल्याला हव्या तेवढ्या रसाच्या प्रमाणानुसार मिश्रणात पाणी घाला. एक उकळी काढा. मग तुम्ही ते भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com