Protein Bar Recipe : घरच्या घरी हेल्दी प्रोटिन बार कसं बनवावं? पहा रेसिपी

आज आपण घरच्या घरी प्रोटिन बार कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Protein Bar
Protein Bar sakal

Protein Bar : हल्ली फ‍िटनेस फ्रिक्‍सवरुन प्रोटिन बार चर्चेत आहे. अनेक लोक आपल्या डाएटमध्येही प्रोटीन बार समाविष्ट करुन घेतात. प्रोटिन बार आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी असतं. अनेकदा आपण कोणतं प्रोटिन बार खातोय, त्यावरही हे प्रोटिन बार हेल्दी आहे की नाही, हे ठरवले जाते.

मार्केटमध्ये असणाऱ्या प्रोटीन बार मध्ये प्र‍िजर्वेट‍िव आणि एक्‍स्‍ट्रा शुगर असते ज्यामुळे हे प्रोटीन बार थोडं अनहेल्दी होतं पण तुम्ही जर घरीच योग्य साहित्य वापरुन प्रोटिन बार तयार करत असाल तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो.

आज आपण घरच्या घरी प्रोटिन बार कसा बनवायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.(how to make healthy Protein Bar at home read recipe )

साहित्यः

  • १ वाटी बिया काढलेले खजूर

  • १/२ वाटी काजूचे तुकडे

  • १/२ वाटी बदाम १/४ वाटी अक्रोड

  • २ मोठे चमचे पिस्ता १ मोठा चमचा तीळ

  • १ मोठा चमचा भोपळ्याच्या बिया

  • २ मोठे चमचे ओट्स १ मोठा चमचा मध

Protein Bar
Vada Pav Pops Recipe : आहाहा...! वडापाव पॉप्सची चवच न्यारी, रेसिपी बघा आणि आत्ताच ट्राय करा

कृती :

  • प्रथम खजुरात थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून चांगली पेस्ट बनवून घ्या.

  • नंतर एका पॅनमध्ये सगळे ड्रायफ्रुट्स, तीळ, भोपळ्याच्या बिया, मंद आचेवर स्वतंत्रपणे खमंग-खरपूस भाजून घ्या.

  • नंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. त्याच पॅनमध्ये ओट्स चांगले भाजून घ्या.

  • त्याची मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. पॅनमध्ये खजुराची पेस्ट घेऊन मंद आचेवर चांगला घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्या.

  • मग त्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स, ओट्सची पावडर घाला. तसेच मध घालून सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.

  • एक मिनिट परतून गॅस बंद करा. एका प्लेटला थोडे तूप लावून त्यावर हे मिश्रण चांगले पसरून घ्या. तासभर हे मिश्रण थंड होऊ द्या.

  • नंतर हव्या त्या आकारामध्ये प्रोटिन बार कट करा. मुलांबरोबर मोठ्यांनाही खायला देऊ शकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com