Kurdaya Bhaji
Kurdaya BhajiEsakal

Kurdaya Bhaji: नुडल्सपेक्षाही भारी लागणारी आणि खायला पौष्टिक असणारी कुरडया भाजी कशी तयार करायची?

पावसाळ्यात कधी कधी भाजीला काही नसतेच
Published on

पावसाळ्यात कधी कधी भाजीला काही नसतेच. तेव्हा घरातल्या डाळींचा पर्याय समोर येतो. पण तोही मग नकोसा झाल्यावर वाळवणाच्या पदार्थांकडे लक्ष जाते आणि त्यातून एक मस्त भाजी गृहीणींच्या हाती लागते, ती म्हणजे कुरडईची भाजी. आज लेखात हीच कुरडईची भाजी कशी करायची याची सविस्तर रेसिपी आपण पाहणार आहोत.

साहित्य

1) 8 ते 10 कुरडया

2) एक कांदा (बारीक चिरलेला)

3) तेल

4) चवीनुसार मीठ

5) चवीनुसार मिरचीचा ठेचा 

6) कोथिंबीर

7) 4 ते 5 कढीपत्त्याची पाने

Kurdaya Bhaji
Adhik Maas 2023: छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजतीय चक्क 'धोंडा स्पेशल थाळी', काय आहे स्पेशल ?

कृती:

सर्वप्रथम भाजी करायच्या आधी कुरडया पाण्यात भिजत घालाव्यात. (कुरडया फार वेळ पाण्यात भिजवू नयेत)कढईत तेल घालून मोहरीची फोडणी  द्यावी. नंतर कांदा खरपूस परतून घ्यावा मग त्यात चवीनुसार मिरचीचा ठेचा घालुन ते चांगल परतून घ्यावे. भिजत घातलेल्या कुरडयांमधील पाणी काढून कुरडया कढईत घालाव्यात.मीठ घालून चांगले परतावे.एक वाफ देऊन गॅस बंद करावा.अशा रितीने नुडल्सपेक्षाही भारी लागणारी आणि खायला पौष्टिक असणारी कुरडया भाजी तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही गरमागरम पोळीसोबत किंवा तशी देखील खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com