Moong Dal Chila : नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक मुगडाळीचा चिला, दिवसभर राहील एनर्जी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Moong Dal Chila : मुगडाळीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि खनिजांचे विपुल प्रमाण आढळून येते.
Moong Dal Chila
Moong Dal Chilaesakal

Moong Dal Chila : सकाळचा नाश्ता जर तुम्ही हेल्दी आणि चविष्ट केला तर दिवसभर पोट भरलेले राहते. शिवाय, शरीरात ऊर्जा देखील राहते. जर तुम्हाला असा हेल्दी आणि चविष्ट नाश्ता हवा असेल तर, मुगडाळीचा चिला हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.

मुगडाळीमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि खनिजांचे विपुल प्रमाण आढळून येते. हे सर्व घटक आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतात. त्यामुळे, या मुगडाळीपासून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही मुगडाळीचा चिला खाल्ला तर दिवसभर तुमचे पोट भरलेले राहते. शिवाय, या मुगडाळीमध्ये कॅलरीज देखील कमी आढळून येतात. शिवाय, हा मुगडाळीचा चिला बनवायला अतिशय सोपा आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांमध्ये ही सोपी रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात मुगडाळ चिलाची सोपी रेसिपी.

Moong Dal Chila
Ragi Dosa Recipe : नाश्त्याला झटपट बनवा हेल्दी आणि टेस्टी नाचणीचा डोसा, एकदम सोपी आहे रेसिपी

मुगडाळ चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • मूग डाळ पाऊण वाटी

  • चाट मसाला अर्धा चमचा

  • लाल तिखट – अर्धा चमचा

  • हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट – १ चमचा

  • पनीरचे ४-५ तुकडे

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

मुगडाळ चिला बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • मुगडाळ चिला बनवण्यासाठी सर्वात आधी मूगडाळ पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.

  • त्यानंतर, सकाळी मुगडाळ मिक्सरला बारीक करा.

  • आता या पेस्टमध्ये मीठ, आले-मिरचीची पेस्ट, तिखट, चाट मसाला, कांदा, पनीरचे बारीक केलेले तुकडे, कोथिंबीर घाला.

  • हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून अर्ध्या तासासाठी बाजूला तसेच ठेवा.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.

  • त्यात तेल किंवा तूप पसरून घ्या. त्यानंतर, त्यात मूगडाळीचे मिश्रण गोलाकार आकारात पसरवा.

  • हा चिला चांगला शिजू द्या. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत चिला चांगला भाजून घ्या.

  • तुमचा गरमागरम मुगडाळीचा चिला तयार आहे. हिरवी पुदिना चटणी, दही किंवा टोमॅटो सॉसोबत हा मुगडाळीचा चिला सर्व्ह करायला घ्या.

Moong Dal Chila
Breakfast Recipe : एका कच्च्या बटाट्यापासून बनवा हा भन्नाट नाश्ता, पोटही भरणार अन् चवदारही होणार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com