

Morning Breakfast Recipe
Sakal
Oats Paratha Recipe: सकाळच्या धावपळीच्या वेळेत पौष्टिक आणि पोटभर नाश्ता बनवणं अवघड जातं. पण जर तुम्हाला काहीतरी हेल्दी आणि झटपट बनवायचं असेल, तर ओट्स पराठा हा एक उत्तम पर्याय आहे. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि आवश्यक खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि जास्त वेळ भूक लागत नाही. ओट्स पराठा लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा आहे. दही, लोणचं किंवा पुदिना चटणीसोबत खाल्ल्यास त्याचा स्वाद अधिक वाढतो. चला तर मग जाणून घेऊया सकाळी झटपट ओट्स पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.