Paneer Chilla Recipe : नाश्त्याला झटपट बनवा पौष्टिक पनीर चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

Paneer Chilla Recipe : प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेला पनीर चिला चवीला देखील उत्तम लागतो.
Paneer Chilla Recipe
Paneer Chilla Recipeesakal

Paneer Chilla Recipe : भारतीय स्वयंपाकघरात नाश्त्याला अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. या खाद्यपदार्थांमध्ये चिल्याचा ही समावेश आहे. अनेक प्रकारचे चिला नाश्त्यामध्ये बनवले जातात. बेसनाचा चिला हा नेहमीच बनवला जातो. याशिवाय, मूग डाळ, कांद्याचा, पनीरचा असे अनेक प्रकारचे चिला आवडीने खाल्ले जातात.

यापैकी पनीर चिला हा सर्वांच्या आवडीचा आहे. प्रथिने आणि कॅल्शिअमने समृद्ध असलेला पनीर चिला चवीला देखील उत्तम लागतो आणि बनवायला देखील अतिशय सोपा आहे. हा पनीर चिला आपण सकाळच्या गडबडीत बनवू शकतो. जर तुम्हाला सकाळच्या नाश्यात्यामध्ये पनीर चिला बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी जाणून घ्या.

Paneer Chilla Recipe
Moong Dal Cheela Recipe : नाश्त्याला बनवा पौष्टिक मूग डाळीचा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

पनीर चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • किसलेले पनीर दीड कप

  • बेसन २ कप

  • बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • चाट मसाला १ चमचा

  • बारीक चिरलेली कोथिंबीर ३ चमचे

  • तेल

  • चवीनुसार मीठ

  • ओवा १ चमचा

पनीर चिला बनवण्याची सोपी पद्धत :

  • चवदार पनीर चिला बनवण्यासाठी सर्वात आधी बेसन घ्या.

  • त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, ओवा आणि चाट मसाला घालून छान मिसळून घ्या.

  • त्यानंतर, त्यात थोड पाणी घालून बेसन पीठ तयार करा.

  • हे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट नसावे, याची काळजी घ्या.

  • आता एका बाऊलमध्ये किसलेले पनीर घ्या.

  • दुसऱ्या बाजूला गॅसवर एक पॅन किंवा तवा गरम करायला ठेवा.

  • तवा गरम झाला की, त्यावर तेल पसरून घ्या.

  • आता यावर बेसनाचे मिश्रण गोलाकार आकारात पसरून घ्या.

  • त्यावर आता किसलेले पनीर आणि चाट मसाला घाला.

  • आता मंद आचेवर पनीर चिला सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्या.

  • आता हा पनीर चिला एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम खायला घ्या.

Paneer Chilla Recipe
Corn Poha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा स्वादिष्ट कॉर्न पोहे, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com