Break Fast Recipe : पोटभर आणि चविष्ट नाश्त्यासाठी बनवा झटपट गव्हाचा दलिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast Recipe

Breakfast Recipe : पोटभर आणि चविष्ट नाश्त्यासाठी बनवा झटपट गव्हाचा दलिया

How To Make Tasty Wheat Dalia : सकाळी उठल्या बरोबर सपाटून भूक लागलेली आसते. पण ऑफीसचे डबे, जेवण, चहा, नाश्ता या सगळ्या गडबडीत नाश्ता काय बनवावा हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही हेल्दी, टेस्टी आणि झटपट बनणारा गव्हाचा दलिया खाऊ शकतात.

बाजारात अर्धवट दळलेले गहू मिळतात. याला आपण दलियाही म्हणतो. या दलियाची दूध आणि गूळ घातलेली खीर आपल्याला माहित आहे. पण सकाळी सकाळी गोड नको वाटते त्यामुळे भाज्या घालून उपम्यासारखा दलिया केल्यास पोटभर आणि हेल्दी होतो.

हेही वाचा: Healthy Breakfast Recipe : आपल्या आजीच्या पद्धतीने बनवा खास तांदळाची उकड

साहित्य

  • दलिया १ वाटी

  • १ गाजर बारीक चिरलेलं

  • १०-१५ मटार दाणे

  • शिमला मिरची १

  • कांदा १

  • घेवडा ३-४

  • धने-जीरे पूड

  • मीठ

  • मसाला

हेही वाचा: Breakfast Recipe: पारंपरिक रेसिपी बोर झालीये? पोह्यांची 'ही' पद्धत ट्राय करा

कृती

भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. दलिया कुकरमध्ये भाताप्रमाणे शिजवून घ्यावा. फोडणीत कडीपत्ता, बारीक चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढून घ्यावी. त्यामध्ये दलिया घालून आवडीनुसार तिखट, मसाला, धनेजीरे पावडर, मीठ घालावे. पुन्हा व्यवस्थित वाफ आणून शेवटी वरुन कोथिंबीर घालावी.

टॅग्स :recipebreakfast