Recipe: घरच्या घरी सीताफळ रबडी कशी तयार करायची ?

सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं.
seetaphal rabadi
seetaphal rabadiEsakal

सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. सीताफळामध्ये कॅलशियम, मॅग्नेशियम, फायबर आणि इतर अनेक पोषक द्रव्ये असतात. त्याने आपल्या शरीराला ताकद मिळते. सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.

हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळ नुसतं खाऊ कंटाळला असाल तर ?

आज मी तुम्हाला जी रेसिपी सांगणार आहे ती नक्की करून बघा..

seetaphal rabadi
kojagiri purnima 2022: काय आहे कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका?

चला तर बघू सिताफळ रबडी कशी तयार करायची?

साहित्य 

एक लिटर दूध

चार वाट्या साखर

दोन वाट्या सीताफळाचा गर

चिमूटभर केशर 

काजु,बदाम, पिस्ता

seetaphal rabadi
Kojagiri Purnima Milk Recipe: कोजागिरी स्पेशल दूध कसे तयार करायचे?

कृती

जाड बुडाच्या भांड्यामध्ये दूध आटवत ठेवावं. अंदाजे निम्मे झालं, की त्यात साखर घालावी. साखर विरघळली, की केशर घालावं. गॅस बंद करून गार होऊ द्यावं. त्यात सीताफळाचा गर मिसळून अलगद ढवळावं. फ्रिजरमध्ये ठेवून थंडगार झाल्यावर सर्व्ह करावं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com