काय सांगता! चक्क रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा

काय सांगता! चक्क रत्नागिरीत आढळला पांढरा कावळा

​​रत्नागिरी :’झूठ बोले कौवा काटे’ ही म्हण संगळीकडे रुढ आहे. कावळा म्हटलं काळा रंग हे गणित ठरलेलं आहे. पण सफेद कावळा(white crow)असं कुणी म्हटलं तर विश्‍वास बसत नाही. पण पांढरा कावळा रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी(Kalbadevi) गावात शेट्येवाडीत आढळला. शेखर शेट्ये (Shekhar shete) यांनी निरीक्षण करुन ही वार्ता फोटोज्, व्हीडीओद्वारे सगळीकडे पाठवली. (ratnagiri-taluka-in-kalbadevi-found-white-crow-kokan-marathi-news)

गेले चार दिवस शेट्ये यांच्या घराजवळ पांढर्‍या कावळ्याची हजेरी चर्चेचा विषय ठरला आहे.काळबादेवी येथील शेखर शेट्ये यांच्या घराजवळ पक्षी परिसरातील झाडांवर आढळतात. चार दिवसांपूर्वी शेट्ये घराच्या बाजूला असलेल्या कोंबड्यांना खाणं घालत असताना काही कावळे तिथे आले. त्यात एक पांढरा पक्षी दिसला. दाणे टिपणारा तो पक्षी कबुतर असावे असे वाटले. थोडे कुतूहलाने त्यांनी त्याचे निरीक्षण केल्यावर तो कावळाच वाटल. त्या पांढर्‍या पक्षाची ठेवण, चोच आणि डोळा हा नेहमीच्या कावळ्यासारखाच होता. थोडावेळ थांबून त्यांनी आवाज ऐकला. तो कावळ्याच.

शेखर यांनी पांढर्‍या कावळ्याची गोष्ट शेजारच्यांना सांगितली. सर्वच जणं त्याला पहायला आले. काहींनी छायाचित्रे काढून सोशल मीडियावरही शेअर केली. पांढरा कावळा हा दुर्मिळ आहे. त्यामुळे हा कावळा काळबादेवीकरांसाठीच नव्हे तर रत्नागिरांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत शेखर शेट्ये म्हणाले की, दुसरा पक्षी आला की कावळे त्याला बोचून काढतात; मात्र पांढर्‍या रंगाचा पक्षी इतर कावळ्यांच्या जोडीने खाद्य खाण्यासाठी घराच्या जवळ निर्धास्त येत आहे. त्यामुळे तो त्यांच्यातलाच असावा असा अंदाज आम्ही केला.

कावळ्याचा पांढरा रंग हा नैसर्गिक आहे. काळबादेवी येथील तो कावळा ल्युकेस्टिक आहे. काळा रंग येण्यासाठी शरीरात मेलिनीनचे द्रव्य आवश्यक असते. ते कमी असल्यामुळे कावळ्याला पांढरा रंग येतो. काळबादेवीत आढळलेला तो कावळा ल्युकेस्टिक आहे. एका अर्थाने हा पांढरा कावळा नाही तर त्याच्यातील अनुवंशिकतेमुळे तो पांढरा राहिला आहे.

- प्रतिक मोरे, पक्षी तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com