24 कॅरेट गोल्ड घेता, पण आईसक्रीम खाणार का? किंमत एकदा बघाच

या आईसक्रीमवर कर आकारला जातो.
gold icecream
gold icecreamesakal

सोशल मिडीयावर सध्या एकसोएक विचित्र प्रकारचे पदार्थ खूप व्हायरल होत आहे. त्यात आता एक अजून आईसक्रीमचा (Icecream) व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हे आईस्क्रीम साधेसुधे नसून सोन्याचे (Gold) आहे. शुद्ध सोन्याचे आईसक्रीम असलेला हा व्हिडिओ खूप व्हायरल (Video Viral) होत आहे.

gold icecream
Video : मसाला डोसा आइस्क्रीम रोल पाहून नेटकरी झाले गार

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हे गोल्ड प्लेटेड आईसस्क्रीम बनवताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात चॉकलेट कोनमध्ये आईसक्रीम टाकण्यापासून होते. मग त्यानंतर हा माणूस त्यावर सोन्याचा वर्ख ठेवतो आणि त्यावर चेरी टाकतो. तसेच त्यामध्ये गोल्डन बॉलही ठेवण्यात आले आहेत. फूड ब्लॉगर अभिनव जेसवानीने त्याच्या नागपुर थिंग्स या आइस्क्रीमचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

gold icecream
तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या

हे 24K गोल्ड आईसस्क्रीम हैदराबादमधल्या Huber & Holly मध्ये मिळत असून त्याचं नाव मिनी मिडास ठेवण्यात आलं आहे. या आईसस्क्रीमची किंमत 500 रुपये असून त्यावर अतिरिक्त कर आकारला जातो. असे त्याने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com