Makar Sankranti Festival: तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या Tilgul Ice Cream | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tilgul Ice Cream
तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या Tilgul Ice Cream

तिळगुळ आइस्क्रीम खाल्लत का? कुठे मिळेल? जाणून घ्या

आज संक्रांत(Makar Sankranta). घरोघरी तिळगुळ, वड्या केल्या जातात. तिळगुळाबरोबर गुळाची पोळीही केली जाते. खाद्यपदार्थांची (Food)मेजवानी असते. पण तिळगुळाचं आइस्क्रीमही खाल्लं जाऊ शकतं?असा फ्लेवर असतो का असा प्रश्न पडला असेल. हो असा फ्लेवर असतो. हे आइस्क्रीम(Ice Cream) सहज मिळतं ते मुंबईत.

आइस्क्रीम करण्यासाठी आवश्यक असलेले दूध, क्रिम, बटर आणि साखर हे मुलभूत घटक या आइस्क्रीमध्ये कायम आहेत. त्यात तिळगुळाचं सारण योग्य प्रमाणात घातल्यामुळे अस्सल तिळगुळाच्या आइस्क्रीमची चव येते.

हेही वाचा: चुलीवरचं आईस्क्रीम खाल्लंय का? कुठे मिळेल? जाणून घ्या..

हे आइस्क्रीम मुंबईच्या सन्मिष मराठे, पराग चाफेकर आणि मिलिंद साळवी यांनी त्रयोग फ्लेवर्स अंतर्गत आणले आहे.आइस्क्रीम म्हटलं की आपल्यासमोर व्हॅनिला, बटरस्कॉच असे फ्लेवर्स डोळ्यासमोर येतात. त्यामुळे महाराष्ट्रीयन गोड पदार्थांचं आइस्क्रीम करता येईल, या संकल्पनेतून तिळगुळ, पुरणपोळी, उकडीचा मोदक असे आइस्क्रीम तयार केले गेले, असे सन्मिष सांगतो. तिळगुळ आइस्क्रीम करताना तीळ- गुळाचा योग्य समतोल साधण्यासाठी त्यांना सहा महिन्यांचा कालावधी लागला. हे आइस्क्रीम खाताना आपण तिळगुळ खातोय की काय असंच वाटेल.

हेही वाचा: मद्यालाही असते Expiry Date! बाटली ओपन केल्यानंतर किती काळ टिकते जाणून घ्या

सध्याच्या कोरोना काळात सगळ्यांनाच सर्दी, खोकला, ताप आदी समस्यांनी ग्रासलं आहे. त्यामुळे एेन संक्रातीत जरी तुम्ही हे आइस्क्रीम खाल्लं नाहीत तरी कुठल्याही सिझनला तुम्ही ते खाऊ शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top