बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन

बिर्याणी नव्हे यावेळी ट्राय करा हैदराबादी बैंगन

हैदराबादी बिर्याणी ही अनेक खवय्यांचा विक पॉईंट आहे. दररोजच्या जेवणाचा कंटाळा आला की हे खवय्यै हमखास हैदराबादी बिर्याणी ऑर्डर करतात. परंतु, यात असेही काही जण असतात ज्यांना कायमच नवनवीन पदार्थ टेस्ट करुन पाहायचे असतात. त्यामुळे ते कायम नव्या पदार्थांच्या शोधात असतात. म्हणूनच, जर हैदराबादी बिर्याणी सोडून तेथील असाच काहीसा ट्रेडिशनल किंवा फेमस पदार्थ ट्राय करायचा असेल तर हैदराबादी बैंगन नक्कीच ट्राय केलं पाहिजे. (hyderabadi baingan recipe made with eggplants tamarind and spices enjoy the taste)

साहित्य -

वांगी - ५०० ग्रँम

जिरं - अर्धा चमचा

मेथीचे दाणे - अर्धा चमचा

हळद - अर्धा चमचा

तिखट - १ चमचा

कढीपत्ता

ग्रेव्हीसाठी साहित्य -

जिरं - १चमचा

धणे - १ चमचा

तेल - २ चमचे

शेंगदाणे-खोबऱ्याची पेस्ट - १ वाटी ( शेंगदाणे व खोबरं भाजून पेस्ट करावी.)

चिंचेचा कोळ -१ चमचा

हिरवी मिरची - १

तीळ - १ चमचा

मीठ - चवीनुसार

कोथिंबीर

हेही वाचा: टोमॅटो खाल्ल्यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतो?

कृती -

प्रथम देठासकट वांगी चिरून मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरे, मेथी, तीळ. कढीपत्ता, हळद, तिखट घाला. आता या फोडणीमध्ये मीठाच्या पाण्यात भिजवलेली वांगी टाका व १० मिनिटे शिजवून घ्या.

वांगी शिजेपर्यंत ग्रेव्ही तयार करुन घ्या. यासाठी तेल गरम करुन खोबरं-शेंगदाण्याचं वाटण घाला व मंद आचेवर शिजू घ्या. वाटण शिजत असताना त्यात चिंचेचा कोळ, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. आता या वाटणामध्ये तेलावर शिजलेले वांगी अॅड करा. अशा प्रकारे हैदराबादी बैंगन तयार.

loading image
go to top