टोमॅटो खाल्ल्यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतो? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो खाल्ल्यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतो?

टोमॅटो खाल्ल्यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतो?

गेल्या काही काळात अनेक जण त्वचेशी निगडीत समस्यांनी त्रस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. यात सोरायसिस हा त्वचाविकार Skin Condition झपाट्याने वाढल्याचं दिसून येतं. सोरायसिस हा एक प्रकारचा ऑटोइम्यून विकार आहे. जो शरीरावरी कोणत्याही भागावर होऊ शकतो. यात त्वचेवर लाल किंवा पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. तसंच शरीरावर खाजही Symptoms of Psoriasis सुटते. खासकरुन गुडघे,हातपाय, त्वचा याठिकाणी सोरायसिस होतो. सोरायसिसचे अनेक प्रकार असून त्याची लक्षणेदेखील वेगवेगळी आहेत. परंतु, सोरायसिस झाल्यावर टोमॅटो Tomato खाऊ नये असं सांगितलं जातं. म्हणूनच, सोरायसिस झाल्यावर टोमॅटोचं सेवन करावं की करु नये हे पाहुयात. (tomatoes-can-flare-up-inflammation-how-to-prevent-symptoms-of-psoriasis)

टोमॅटो खाल्ल्यामुळे सोरायसिसचा त्रास वाढतो?

सोरायसिसच्या रुग्णांनी टोमॅटो Tomato खाल्यावर त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकतो अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजे काही अंशी हे खरेदेखील आहे. केवळ टोमॅटोच Tomato नाही नाइटशेड प्रकारातील फळे व भाज्या सोरायसिस रुग्णांनी टाळायला हव्यात.

नाइटशेड फूड म्हणजे काय?

नाइटशेड फूडमध्ये बटाटे, वांगी, सिमला मिरची, मिरची या भाज्यांचा समावेश केला जातो. सोरायसिसच्या रुग्णांनी या भाज्यांचं अतिप्रमाणात सेवन केलं तर त्यांना शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातं. परंतु, याविषयी ठोस माहिती नसून अद्यापतरी त्यावर संशोधन सुरु आहे.

टोमॅटोऐवजी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश

सोरायसिस असलेल्या रुग्णांनी टोमॅटोऐवजी अन्य लाल भाज्यांचा आहारात समावेश करावा. तसंच गाजर, पालेभाज्या, आंबा, स्क्वॅश, रताळं, सुके एप्रिकॉट, आंबट फळे, स्ट्रॉबेरी, अननस, किवी आणि पपई याचं सेवन करावं.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)