नवनवीन पदार्थ करायला आवडतात - मृण्मयी कोलवलकर

सर्व पदार्थांमध्ये मला सगळ्यांत जास्त भारतीय पदार्थ आवडीचे आहेत
food
foodsakal

मी फूडी असल्यानं कुठेही गेले, तरी निरनिराळ्या पदार्थांची चव चाखण्याची, त्यांचा आस्वाद घेण्याची मला हौस आहे. मला लेबनिज, चायनीज, थायलंडमधल्या डिशेस आवडतात. त्याचमुळे माझे मुंबईतील सर्वात आवडते रेस्टॉरंट आहेत ‘बेरूट’, ‘याजू’ आणि ‘बॉंबे सॅलड’. त्या रेस्टॉरंट्समध्ये मी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यास हमखास जाते. मात्र, मला सगळ्यात जास्त भारतीय पदार्थ आवडतात.

त्यातूनही घरी बनविलेल्या पदार्थांची चव वेगळीच असते. मला माझ्या नीला आत्यांनी केलेला अस्सल सीकेपी स्टाइलचा चिकन रस्सा खूप म्हणजे खूपच आवडतो. मी मनापासून खात असले तरी स्वयंपाक करणं आधी तितकंसं मनावर घेतलं नव्हतं. मात्र, आता स्वयंपाकघरामध्ये माझे अधूनमधून प्रयोग सुरू असतात; पण मला अजून खूप शिकायचं आहे. निदान आपल्या आवडीचे पदार्थ तरी आपल्याला आले पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत असते.

मी केलेल्या एका पदार्थाची गंमत आठवते. आईचा सर्वांत आवडता पायनॅपल केक करून तिला वाढदिवसाचं सरप्राईज द्यायचं होतं. त्यासाठी इंटरनेटवर बघून मी तो बनविण्यासाठी सगळी तयारी केली; पण कसं कोण जाणे- काहीतरी चुकलं आणि तो केक खालून पूर्णपणे करपला होता. त्यामुळे आई सरप्राईज पाहून शॉक झाली होती. माझा भाऊ समित अजूनही मला चिडवतो, की ‘पायनॅपल केक’चा ‘ब्लॅक फॉरेस्ट’ कसा झाला?

आईच्या हातचे सगळेच पदार्थ मला आवडतात; पण सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा ही तिची खासियत आहे. आम्हाला सगळ्यांनाच तिच्या हातचा शिरा खूप आवडतो. खरंच शिरा करावा तो तिनेच. खरंतर ‘सुगरण’च्या निमित्ताने आजच तिला शिरा करायला सांगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com